पर्वती – पुणे पोलिसांचा दहशत माजविणाऱ्या टोळींवर ५३वा मोक्का दणका….!

खादी एक्सप्रेस प्रतिनीधी (ऑनलाईन) : पुणे शहरात कधी कोयता गॅन्ग तर कधी कोणत्या नावाने नवनवीन टोळी जन्म घेवुन शहरात दहशत निर्माण करणाच्या गुंड टोळयाविरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रक कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या कडुन मिळताच पुणे पोलिसानी देखील आपल्या कायदयाचा दणका देण्याचे सत्र सुरू केले, पुणे पोलिसांमार्फत मोकाट गुड टोळयाविरोधात आत्ता पर्यंत ५२ मोक्का कारवाया पार पाडुन नुकतीच ५३ व्या कारवाईचा दणका देत संकेत देविदास लोंढे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेविरूध्द पर्वती पोलीसांनी मुसक्या आवळत सदर टोळी विरोधात पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं. २९७/२०२३ भा.द.वि.क. ३०७ ४५२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, आर्म ॲक्ट ४ (२५) म.पो.अधि. कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे..सदर टोळीविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) संकेत देविदास लोटे, वय: २० वर्षे पर्वती गायथा, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर साथीदार २) प्रतिक ऊर्फ विटया पांडुरंग कांबळे, वय २० वर्षे, रा. सिंहगड रोड, पुणे ३) अजित ऊर्फ आज्या संजय तायडे वय २० वर्षे, रा. जनता वसाहत, पुणे ४) शुभम दिगंबर गजधने वय १९ वर्षे, रा. दांडेकर पुल पुणे तसेच ०३ विधिसंघर्षित बालक (टोळी सदस्य) यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने यातील अ. क्र १ ते ४ याना अटक करण्यात आली आहे..यातील आरोपी नामे संकेत देविदास लोहे (टोळी सदस्य) व त्यांच्या टोळीविरोधात एकुण ०६ गुन्हे दाखल असून, त्याने त्याचे साथीदार प्रतिक ऊर्फ बिटया पाडुरंग कांबळे, अजित ऊर्फ आज्या संजय तायडे, शुभग दिगंबर गजधने यांचेसह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट संकेत लोंढे याने तयार करून मागील १० वर्षात खुनाचा प्रयत्न, दुखापत किंवा हमला इत्यादी करण्याची धमकी देवून किंवा हमला इत्यादी करण्याची पूर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण बेकायदेशीर जमाव जमवणे, दुखापत, बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे मृत्यु किंवा जबर दुखापत घडवून आणणे इत्यादीची धमकी, सार्वजनिक ठिकाणी लोकाच्या जीवीतास धोका निर्माण करण्याचे उद्देशाने दहशत निर्माण करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी टोळीचे वर्चस्वा साठी व दहशत कायम ठेवून सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती नमुद आरोपी यांचेविरूध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले.सदर प्रकरणात पुढील तपास मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग पुणे शहर श्री.अण्णासाहेब शेवाळे हे करीत आहेत

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल