पुणे – ‘ अरुण गवळी ‘ (डॅडी) सुटकेच्या पुढच्या प्रयत्नात कँटोन्मेंट मतदार संघ….सही मोहिमेचे पाऊल टाकत….

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात सध्या नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले अरुण गवळी (डॅडी) यांनी सध्या वयाची सत्तरी गाठली असून हत्या प्रकरणात १५ वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास ही भोगला आहे, याच पार्श्वभूमीवर वर्ष 2006 च्या महासरकारच्या परिपत्रिकेचा आधार घेत मार्च २०२३ मध्ये अरुण गवळीने त्याच्या वकिलांच्या मार्फत न्यायालयाला तुरुंगातून मुदतपूर्व सुटकेची मागणी केली खरी पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही, आणि म्हणूनच पुणे शहर कँटोन्मेंटचे अध्यक्ष अखिल भारतीय सेना पुणे शहर व जिल्हा, फिरोज रफीक शेख यांनी आपल्या ३ हजार पेक्षा जास्त कार्यकर्त्यांसह डॅडी साहेबांची तुरुंगातून मुदत पूर्व सुटका होण्यासाठी सही मोहीम राबवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडे न्यायासाठी दाद मागितली आहे, ” अरुण गवळी (डॅडी) हे गेली १५ वर्षे तुरुंगात आहेत. ते उपस्थित नसल्याने आमची शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक व इतर सामाजिक कामे करण्यास अडथळा उत्पन्न होत आहे. आमची आपणांस विनंती आहे की, त्यांची लवकरात लवकर मुदतपूर्व तुरुंगातून सुटका करावी. ही विनंती…” अश्या विनंतीचे मोठ मोठ्या बॅनर मधुन सही मोहिमे द्वारे सुटकेसाठी केलेल्या याचिकेवर तसेच राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार, जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना १४ वर्ष तुरुंगवास पूर्ण केल्यावर, तसेच त्यांचे वय ६५ पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल. जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी २००७ पासून तुरुंगात असल्याने गेली १६ ते तुरुंगात आहे. वर्ष 2006 च्या महा सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी हे पात्र आहेत मात्र आता या सही मोहिमेद्वारे केलेल्या याचिकेवर मुख्यमंत्र्यांची काय प्रतिसाद येते यावर सद्या सर्वांचे लक्ष लागून आहे….अरुण गवळीचा काय आहे इतिहास ?दगडी चाळ पासून गुन्हे विश्वात आपली ओळख निर्माण करणारे अरुण गवळी परदेशात पळून न जाता, मुंबईत बसून अंडरवर्ल्ड चालवणारा एकमेव डॉन म्हणून ओळख निर्माण झाली, अरुण गवळी ( डॅडी) यांना एकेकाळी हिंदू डॉन अशी ओळख मिळाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही काही भाषणातून हिंदू डॉन अरुण गवळीला अप्रत्यक्ष पाठिंबा देत त्याच्या विरोधातील पोलीस कारवायांवर टीका केली होती. तेव्हा बाळासाहेबांनी अरुण गवळी, साई बनसोड यांच्यासाठी “आमचे मुलगे” असे शब्दप्रयोग वापरले होते. पुढे युती सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना अंडरवर्ल्ड विरोधात गृह विभागाच्या कारवाया पासून पुरेसं संरक्षण न मिळाल्यामुळे अरुण गवळी शिवसेना पासून दुरावला गेला असल्याची चर्चा आहे. अरुण गवळीने शिवसेनेला आव्हान देत शिवसेनेच्या पद्धतीनेच अखिल भारतीय सेना उभारली. त्यांनंतर प्रभादेवी परिसरात बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत विश्वासू जयंत जाधव यांच्या हत्या प्रकरणानंतर अरुण गवळी शिवसेनेच्या रडारवर आला. अरुण गवळी याने 2004 मध्ये दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत त्या तब्बल 90 हजार मते घेतली. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत गवळी भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडले गेले. पुढे 2006 मध्ये घाटकोपर परिसरात शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची अरुण गवळीच्या टोळीने हत्या केली. त्याच प्रकरणात अरुण गवळी (डॅडी) यांना अटक होऊन पुढे जन्मठेपेची शिक्षा झाली.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल