कोंढव्यात ५६ व्या कारवाईत अक्षय अशोक लोणारे टोळी वर मोक्का….!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) :- पुणे पोलिसांमार्फत मोक्का कारवाईच्या धडाक्याने दहशत माजविनाऱ्या गुंड टोळ्यांची चांगलीच कांबरमोड झाली आहे… नुकत्याच पुण्यातील कोंढवा परिसरात ५६ वी मोकका कारवाई करत दाखल गुन्ह्याच्या आधारे आरोपी नामे १) अक्षय अशोक लोणारे ( टोळी प्रमुख) वय २८ वर्षे रा. भिमनगर कोंढवा खुर्द पुणे ( टोळी प्रमुख) २) अनिकेत राजु देशपांडे वय २३ वर्षे रा. चामुंडा ज्वलेर्स चे पाठामागे कोंढवा पुणे (टोळी सदस्य) ३) दिनेश रामदास घाडगे वय २२ वर्षे रा. पारगे चौक भैरवनाथ मंदिराचे जवळ कोंढवा बु पुणे (टोळी सदस्य) यांना अटक करण्यात आलेली आहे.दाखल गुन्ह्यात अनुसरून, फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं. ५९२ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२३, ५०४,३४, क्रिमीनल अमेंटमेंट अॅक्ट ७ महा. पो. अधि. कलम १९५१ क. ३७ ( १ ) सह १३५ कलम वाढ – महा.पो.अधि. कलम १४२ हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान आरोपी टोळी प्रमुख १) अक्षय अशोक लोणारे (टोळी प्रमुख) याने त्याचे साथीदारांसह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन त्याचे वर कोंढवा पोलिस स्टेशन येथे एकूण १२ गुन्हे दाखल असुन सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलूम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार करून, स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता त्यांनी संघटितपणे व वैयक्तीकपणे खुनाचा प्रयत्न बलात्कार जबरी चोरी करणे, घरफोडी करणे बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, लुटमार करणे, लोकांना दमदाटी करणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. सदर आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील आरोपींनी वारंवार सदर गुन्हे केले आहे. सदर प्रकरणी छाननी करून कोंढवा पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं. ५९२ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ३२३, ५०४,३४, क्रिमीनल अमेंटमेंट ॲक्ट ७.महा.पो.अधि. कलम १९५१ क ३७ ( १ ) सह १३५ कलम वाढ महा.पो.अधि. कलम १४२ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३(४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्री. शाहुराजे साळवे हे करीत आहेत. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री रितेश कुमार यानी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे कारणारे व नागरिकामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल