पुणे – टास्क, पार्ट टाईम जॉब, बँकेच्या नावाने सायबर चोरांचा लाखोंवर डल्ला…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पुण्यात चोरी, फसवणूक, अश्या घटना आता काही नव्या वाटत नाही, दैनंदिन या पैकी एक ना एक घटना एकण्यात, पाहण्यात येतेच बदलते ती फक्त चोरीची करण्याची पद्धत त्यातच चोरांनिही टेक्नॉलॉजीचा मोठा वापर करत सुशिक्षित पद्धतीने चोरी करण्याच्या घटनेने पुण्यात उचांक गाठत आहे…पहिल्या घटनेत : ‘ वर्क फ्रॉम होम ‘ चे आमिष दाखवून विश्वास संपादन करून, महीले कडून ऑनलाईन टास्क पूर्ण घेऊन, बालेवाडी हाइस्ट्रीट, बाणेरगाव पुणे येथील ३३ वर्षीय महिलेची तब्बल ४,३३,०००/- रु. इतक्या रकमेची आर्थिक फसवणुक केली आहे, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून चतू:र्शृंगी पो स्टे १२०/२०२३ मादविक ४५९, ४२०,३४ सह माहिती तंत्रज्ञान अधि कलन ६६ (डी) अन्वये अज्ञात इसमा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत : शिवणे, प्लॅट नं १०२ हरी हाईटस देशमुखवाडी, पुणे परिसरातील व्यक्तीला, आरोपी इसमाने अज्ञात नंबर फोन करून ” मी डीबीएस बँकेच्या कस्टमर केअर मधून बोलत असून तुमच्या क्रेडिट कार्डवरील इन्शुरन्स रदद करण्यात येत आहे, सेवा पुढे चालू ठेवायची असेल तर तुमच्या फोन वर आलेला ओ. टी. पी. सांगा ” बोलत फिर्यादी कडून ओटीपी घेत तब्बल वेगवेगळ्या ट्रान्जेक्शन द्वारे ३४.४४०/- रू.बी आर्थिक फसवणूक करून पैसे काढून घेतलेसदर दाखल फिर्यादी नुसार अज्ञात आरोपी विरोधात उत्तम नगर पो.स्टे. गुरनं / कलम १०८ / २०२३ भादवी ४१९, ४२० माहीती तंत्रज्ञान अधि कलन ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ऑनलाइन टास्क’ द्वारे पैसे कमवा अश्या जाहिराती किंवा चित्रफितींना लाइक मिळवून देण्याच्या कामाच्या बदल्यात भरघोस पैसे देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी सुमारे तीनशे पेक्षा अधिक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या संदर्भात सायबर पोलिस ठाण्याकडे १८५ पेक्षा जास्त तक्रारी; तसेच विविध पोलिस ठाण्यांत सुमारे शंभर तक्रारी आल्या आहेत. चालू वर्षांतील सायबर गुन्ह्यांत या ऑनलाइन टास्कच्या सर्वाधिक तक्रारी असल्याने सायबर चोरट्यांची शोधलेली ही नवीन क्लृप्ती पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल