पुणे – विमानतळ भागात लाखोंची अमली पदार्थ विक्री करणाऱ्यास अटक.अंमली पदार्थ विरोधी पथक २ आणि पोलिसांची आणखी एक धडक कारवाई

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पुणे शहरात वाढणारी गुन्हेगारीचा भाग असणारी अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीला मुळापासून नष्ट करण्याचा निश्चय केलेल्या अमली पदार्थ विरोधी पथक र कडुन राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत विमानतळ पोलिस विभाग व अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडुन धडक कारवाई करत राजस्थान येथून अमली पदार्थाची विक्री करणान्यासाठी आलेल्या गोपीचंद रामलाल बिश्नोई (वय: २८) सध्या रा. सध्या राहणार रामदेव फर्निचर, पी.सी.एस. चौक, मरकळ रोड, चन्होली खुर्द, पुणे, मुळ गांव पोस्ट पुनासा, ता भिनमाल, जि. जालोर, राज्य राजस्थान याला अटक करून त्याच्या विरूद्ध विमानतळ पो.स्टे. येथे गु.र.नं. ४४५/२०२३ एन. डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २१(क) २२(क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.अंमली पदार्थ विरोधी पथक २ विशेष मोहिमे अंतर्गत पथकाकडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडील अधिकारी व अंमलदार, पोशि मांढरे यांना दि. २४ ऑगस्ट (गुरुवार) रोजी रामचंन्द्र काळे नगर, लोहगांव, पुणे येथील सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी गोपीचंद बिश्नोई हा अमली पदार्थ विक्रीसाठी घेवुन जात असल्याची माहिती मिळताच सापळा रचत गोपीचंद बिश्नोई यांस अटक केली त्यावेळी त्याच्या कडुन तब्बल ३१२ ग्रॅम ६० मि.. प्र. हेरॉईन ४६,८९,०००/- रू. कि. चा हेरॉईन व मॅफेड्रॉन (एम.डी) १०,७७,२००/ रू. कि. असा एकूण ५७,६६, २००/- रू. कि. चा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे हा श्री सतीष गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक ह्या गुन्हे शाखा, पुणे शहर श्री. सुनिल थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अनलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविन्द्र रोकडे, मयुर सूर्यवंशी, वेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुंखे, साहिल शेख, नितीन जगदाळे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड व महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर यांनी केली आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल