पुण्यात..! महिलेचा पाठलाग….नकळत फोटो…गुप्तचरांवर भारी पडली पोलिसांची शक्कल..!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : खाजगी डिटेक्टीव (गुप्तचर) म्हणून पुण्यातील २ तरुण डिसेंबर २०२२ पासून कोरेगाव पार्क भागातील आरोग्य सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या एका ३२ वर्षीय महिलेचा हे तरुण पाठलाग करत होते महिलेवर तिच्या नकळत नजर ठेऊन तिच्याघराबाहेर पारत ठेऊन, हॉटेल, मॉल, आणि खाजगी ठिकाणी गेली असता तिचा पाठलाग करून नकळत सदर महिलेचे छायाचित्र काढून, ती कोठे जाते- येते या सोबतच तिची पूर्ण दिनचर्या तिऱ्हाइत इसमाला पोहचवत, आपला कोणीतरी वारंवार पाठलाग करत असल्याची संशय येताच सदर महिलेने भरोसा सेल पुणे पोलीस विभागात या बाबत फिर्याद दाखल केली.प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन ए.सी.पी नारायण शिरगावकर यांनी पोलीस पथक तयार करून आरोपींचा छडा लावण्याचे आदेश देताच, सापळा रचून साध्या वेशात पाळत ठेवून असणाऱ्या पुणे पोलिसांनी ७ जानेवारी रोजी कोरेगाव पार्क येथील एका हॉटेल मध्ये फिर्यादी महिलेचे नकळत फोटो काढताना निलेश लक्ष्मणसिंग परदेशी (वय २५ वर्ष, रा. वडगाव मावळ) आणि राहुल गुणवंतराव बिरादार (वय ३० वर्ष, रा. देहूगाव, ता. मावळ) या दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडुन ताब्यात घेतले.अटक आरोपी पैकी निलेश परदेशी याची खासगी गुप्तचर संस्था असून राहुल बिरादर सहायक आहे. फिर्यादी महिलेची गुप्तहेरां मार्फत नजर ठेवणाऱ्या मूळ सूत्रधाराचा आणि फोटोंचे सोशल मीडिया किव्वा अन्य कोठे दुरुपयोग केला आहे का या बाबत पोलिस पुढील तपास करीत आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल