पुणेकरांना ८४ लाखांचा गंडा..! क्रिप्टो मध्ये चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक. सायबर पोलिसांकडून अटक….

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): गुन्हेगारीच्या वाढत्या आकड्यामध्ये सायबर गुन्ह्यांचा आकडाही मागे नाही, दुबई मधल्या बिट्सोलाइव्हज प्रा. लि. तसेच इंग्लंड मधील बुल इन्फोटेक या कंपन्यांच्या पदाधिधारकां कडून काही दिवसांपूर्वी एका सेमिनारचे आयोजन केले होते. या सेमिनार मध्ये चांगल्या परताव्याचा आमिष दाखवून तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांची पुणेकरांची फसवणूक केली आहे, या प्रकरणात आरोपी गणेश शिवकुमार सागर (वय ३४,द्वारका, नवी दिल्ली ) यास पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. सायबर पोलिसांना मागील काही दिवसांपासून अश्या फसवणुकीच्या अनेक तक्रारी मिळत होत्या, सायबर पोलिसांकडून गंभीर दखल घेऊन आरोपीची शोध मोहीम सुरू झाली ज्यात आरोपी म्हणजेच बिट्सोलाइव्हज प्रा. लि. चा पदाधिकारी हा दिल्ली मध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी दिल्ली,उत्तमनगर येथील आरोपीच्या राहत्या घरातून त्याला अटक केली, असून न्यायालयाकडून आरोपीस ५ मार्च पर्यंतची कोठडी सुनावली आहे. आरोपीने पुण्यातील नागरिकांना बक्स कॉइन, क्रिप्टो करन्सी या मार्केटिंग स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यास प्रेरित केले, ज्यात कॅश फिनिक्स नावाचे क्रिष्टी एक्सचेंज तयार करून ब्लॉकचेन तयार केली (ब्लॉकचेन हे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीचे रूपांतर digital स्वरुपात केले जाते आणि त्याचा data जतन करून ठेवला जातो) गुंतवणूक दारांना जाळ्यात अडकवण्याचा साठी प्लॅन्स, वेबसाईट पोर्टलचा ही उपयोग केला. जे नागरिकांना कडून पैसे उकळतच काही दिवसां नंतर बंद झाले. फक्त पुण्यातली नाही तर जगभरातील अनेक लोकांची या आरोपीने फसवणूक केली आहे.क्रिप्टो करन्सी म्हणजे काय…? क्रिप्टो हे एक डिजिटल चलन आहे जे संगणक नेटवर्कद्वारे व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केलेले आहे. हे चलन टिकवून ठेवण्यासाठी किंवा राखण्यासाठी सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून नाही.वैयक्तिक नाण्यांच्या मालकीच्या नोंदी डिजिटल लेजरमध्ये संग्रहित केल्या जातात. हा लेजर व्यवहाराच्या नोंदी सुरक्षित करण्यासाठी, अतिरिक्त नाण्यांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नाण्यांच्या मालकीच्या हस्तांतरणाची पडताळणी करण्यासाठी मजबूत क्रिप्टोग्राफी वापरलेला संगणकीकृत डेटाबेस आहे.क्रिप्टोकरन्सीला अंतरजालीय चलन असेही म्हणतात. ही एक प्रकारची डिजिटल मालमत्ता आहे. या गंभीर प्रकारची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, आर्थिक व सायबर उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके,यांच्या मार्गदर्शनाखाली …तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक संगीता माळी, सहा. पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव,पोलीस हवालदार अस्लम अत्तार,पोलीस नाईक मंगेश निमसे, शिरीष गावडे, प्रसाद पोलदार, योगेश वाव्हळ, निलेश शेलार, प्रवीणसिंह राजपूत, अंकिता राधी, सारिका दिवटे, दिनेश मरकड, किरण जगदाळे या पथका कडून करण्यात आली.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल