वीजबिल थकबाकीदारांना “शॉक”देणार ही बातमी…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन)- कोरानो काळात वापरत आलेल्या विज बिल माफ होईल या आशेवर असणाऱ्या बऱ्याच लोकांचा हा गोड भ्रम आखेर राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोडला आहे, वीजबिल थकबाकीदारांनी शक्य तितक्या लवकर आपले थकीत बील भरावे अन्यथा त्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येईल असे राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी आपल्या भाषणात सांगितले . कोरोना काळात वीज खंडित न करता लोकांना वीज पुरवठा आमच्या कडून सुरळीत पार पाडण्यात आला ज्यामुळे लोकांनी घरी फ्रीज, टीव्ही, सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुरेपूर वापर केला, सोबतच वर्क फ्रॉम होम साठी वीज पुरवठ्या मुळेच लॅपटॉप, वायफाय, ई. साठी लोकांना कोणताही त्रास झाला नाही परंतु या सेवा पुरविणे कामी वीज पुरवठा कर्मचारी २४ तास तत्पर होते, कारोना काळात बऱ्याच महावितरण कर्मचारी यांना आपला जीव ही गमवावा लागला. ऊर्जा मंत्री यांनी पुढे भाष्य केले, “महावितरणवर 69 हजार कोटी कर्ज आहे. आम्ही कर्ज काढून कामकाज करत आहोत अजून किती करणार? तरी वीज बिल सवलतीचा विषय आता नाही”, तरी कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, जर थकबाकीदारां कडून वीजबिल भरणा करण्यात नाही आला तर वीज कनेक्शन कापण्यात येईल असे अशा शब्दात वीजबिल सवलत मिळणार का या प्रश्ना चे उत्तर दिले.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल