पुणे – डेटिंग ॲपच्या मैत्रिणीचीयुवकाला बेदम मारहाण आणि लूट….चंदन नगर पोलिसानं कडून गुन्हा दाखल..
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : ऑनलाईन मैत्री..प्रेम..चे फासे टाकून लोकांना भेटण्यास बोलावून लुबडण्याचा नव्या ट्रेण्ड मध्ये घोरपडी गाव, पुणे येथील ३४ वर्षीय युवकाला ऑनलाईन मैत्री चांगलीच महागात पडली आहे, सदर महिलेने डेटिंग अॅपव्दारे चॅटिंग करुन मैत्री ते प्रेमिका पर्यंतचे जाळे टाकून, फिर्यादीस डेंटिंगसाठी भेटणेबाबत सांगुन, खराडी येथे रूम बुक करण्यास सांगून, सदर ठिकाणी महिला हिने तिच्या आणखी एका मित्राला बोलावून त्याच्या सोबत मिळून रूम मध्ये फिर्यादीस बेदम मारहाण करुन जखमी केले आणि फिर्यादी यांचे मोबाईल जबरीने ताब्यात घेवुन ‘ आमच्या विरोधात तक्रार केली तर तुला बलात्काराच्या केस मध्ये अडकवेल ‘ अशी धमकी देऊन फिर्यादी यांचे मोबाईचे गुगल पे मधुन २०,०००/- रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेवुन, फिर्यादी यांचे गाडी मधील ठेवलेली काही रक्कम देखील घेवुन पळ काढला…सदर प्रकरणी फिर्यादी यांनी चंदननगर पोलिसात धाव घेऊन आरोपी महिला आणि त्याच्या साथीदारा विरोधात तक्रार दाखल करून चंदननगर पोलिसांनी आरोपीविरोधात ५०२ / २०२३ गुन्हा दाखल केला आहे.