P town.. एम सी स्टॅन सह सलमान खान नव्या वादात…पुणे कोर्टाची ऑर्डर…काय आहे नेमक प्रकरण…?
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाइन: ‘ P town’ फेम एम सी स्टॅन म्हणजेच अल्ताफ शेख आणि सलमान खान आता नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे…तक्रारदार पुरशोत्तम कढे यांनी दाखल केलेल्या दाव्या संदर्भात पुण्यातील न्यायालयाने अल्ताफ शेख आणि सलमान खान यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पारित केले आहे…कारण आहे फोटो…नेमके प्रकरण असे की…नुकताच प्रसिध्दी गाठलेला पुण्यातील रॅपर अल्ताफ शेख (MC stan) याने बिग बॉस १६ चे विजेतेपद मिळवताच यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया एकच धूम माजली ज्यात अल्ताफ शेख च्या जीवनाचा आता पर्यंतचा प्रवास…जीवनातील चढ उतार मांडत…पूर्वीचा आपला सलमान खान सोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड करत, एम सी स्टॅन ने दाव्यातील तक्रारदार पुरशोत्तम कढे यांचा सलमान खान सोबतचा फोटो त्यांची कोणतीही परवानगी न घेता फोटोतील तो मुलगा स्वतः असल्याची चुकीची माहिती प्रसारित केली आहे…कढे यांची कोणतीही परवानगी न घेता गैर कायदेशीरपणे त्यांच्या फोटोचा वापरकेला असल्या कारणामुळे न्यायालयाकडून मनाई हुकूम करण्यात यावा या मागणीसाठी कढे यांनी अल्ताफ शेख, सलमान खान आणि इतर यांच्या विरुध्द व्ही.आर. राणे यांच्या मे. दिवाणी न्यायालय पुणे, मध्ये दावा दाखल करुन दाद मागितली सदर खटल्याची सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार असून अल्ताफ शेख, सलमान खान आणि इतर त्यांचे साथीदार यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे…दाव्यातील तक्रारदार पुरुषोत्तम कढे हे १९८८ सालापासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये छायाचित्रकाराचे काम करत आले आहेत.

त्याचबरोबर पुण्यातील अनेक वर्तमानपत्रांसाठी मुक्त छायाचित्रकार म्हणूनही ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या व्यवसायामुळे अनेक सेलिब्रिटी सोबत कढे यांचे फोटो आहेत आणि याच छायाचित्रांचा संच करून त्यांनी आपला छंद जोपासला, सन १९८९-९० सालचा त्यांचा सलमान खान सोबतचा एक जुना फोटो स्वतःच्या नावाने अल्ताफ शेख याने सोशल मीडियावर प्रकाशित केला…ज्यावर कडे यांनी “माझा फोटो शेख ऊर्फ स्टॅन याने स्वतःच्या नावानेप्रसारित केला, यावर माझा आक्षेप आहे. शेख याने जाणीव पूर्वक फोटो प्रसारित करून माझी प्रतिमा मलिन केली. त्याचा माझ्याव्यवसायावर परिणाम झाला आहे” या शब्दात प्रतिक्रिया देत तसेच त्यांचे वकील वाजेद खान-बीडकर यांनी इंस्टाग्राम,रिल्स, द्विटर, फेसबुक आणि इतर माध्यमांवर कढे यांच्या फोटोचेप्रसारण करण्यात आले आहे.

त्यासाठी कढे यांची कोणतीही परवानगीशेख याने घेतलेली नाही, फोटोचा बेकायदेशीर वापर केल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.