Kondhwa khurd | कोंढवा पोलिसांनी सुतावरून गाठले स्वर्ग…आरोपी…मृतेची ओळख…दगडाने चिरडुन हत्येचा लावला असा छडा….!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) :: काही गुन्हे असे असतात की त्यात कोणताही ठोस पुरावा आढळुन येत नाही अशीच एक घटना म्हणजे ०२ जानेवारी रोजी कोंढवा एन.आय.बी.एम परीसरातील हत्या प्रकरण. ज्या प्रकरणात कोंढवा पोलिसांना आपल्या उत्कृष्ठ कामगिरीतुन अक्षरशः सुतावरून स्वर्गच गाठले..आरोपी आणि मयताची ओळख पटण्यासाठी हातात कोणताही दुवा नसताना देखील पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरोपींना जेरबंद करून १० दिवसांत मृत महिलेची माहिती मिळवली. सदर घटनेत आरोपींनी ३२ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड टाकुण निर्घुणपणे हत्या केली आणि निवस्त्र अवस्थेत मृतदेह झाडीत फेकुण दिला. कोंढवा पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेवुन मृतदेह ताब्यात घेतला त्याच वेळी परीसरात निर्माण झालेली भिती आणि दहशतीच्या वातावरणाची कल्पना देखील कोंढवा पोलिसांना झाली, ज्यानंतर कोंढवा पोलिस एक्शन मोड मध्ये आली आणि अवघ्या २४ तासांत हत्येचे २ आरोपी आयान सय्यद आणि जहेद शेख (दोघे रा. शिवनेरी, कोंढवा खुर्दे ( Kondhwa khurd ) यांना बेडया ठोकल्या कोंढवा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीने कोंढवा पोलिसांची मान तर उंचावलीच पण कोंढवा परीसरातील भीतीचे वातावरणही क्षणात बदलले पण आता कोंढवा पोलिसांसमोर सर्वात मोठी परीक्षा होती ती म्हणजे मृत महिलेची ओळख पटवणे…आरोपींनी चिन्न विछिन्न केलेला चेहरा…विवस्त्र मुतदेह…आणि मृतेच्या हातावरील गोंदलेले नावे यापलीकडे कोणतीही माहिती कोंढवा पोलिसांकडे नव्हती.…मृत महिला कोण…? कोठुन आली..? तिचे कुटुंब कुठे…? यासर्वांचा छडा लावण्यासाठी एकही दुवा पोलिसांकडे नव्हता…पण कोंढवा पोलिसांनी तेवढयाच निष्ठेने अशक्य वाटणारी गोष्ठ शक्य करून दाखविली घटना घडल्यापासुन तुटपुंज्या माहितीच्या आधारे महिलेची ओळख पटवण्याची धडपड सुरू झाली आणि आखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले…मृत महिलाचे नाव रेणुका असुन ती सध्या शिवनेरी नगर, कोंढवा खुर्दे या ठिकाणी रहावयास होती मुळची सोलापुर मधील रहीवासी असलेल्या महिलेची संपुर्ण माहिती अवघ्या १० दिवसांत लावुन पोलिसांमार्फत तिच्या कुटुंबियांना घटनेची माहिती दिली ज्यानंतर मृत महिलेच्या कुटुंबियांनी हातावरील गोंदलेल्या नावावरून हि त्यांचीच रेणुका असल्याचे पोलिसांना सांगितले. या सर्व प्रकरणात ( kondhwa police station ) कोंढवा पोलिस निरीक्षक गुन्हे संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर आणि त्यांच्या पथकाने उत्कृष्ठ कामगिरी दाखवत पुर्ण प्रकरणाचा छडा लावला आहे.