त्या रात्रीच्या चाकू हल्ला अन लूट प्रकरणात….कोंढवा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाइन: एन. आय.बी.एम रोड, कॅफे इंडिया हॉटेलजवळ, कोंढवा परीसर, (०४ डिसेंबर) वेळ रात्री ११:३० सुमारास ६ अज्ञात इसमांनी चाकुने वार करून लुट केल्याचा प्रकार समोर आला ज्यानंतर कोंढवा पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत ३ आरोपींना अटक केली असून, घटनेतील सर्व आरोपी विरोधात भा.द.वि. कलम ३९५, ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. अरविंद राममनोहर कसरवाणी (रा. उंद्री पुणे) रात्री आपली पानटपरी बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असतानाच ३ एक्टिव्हा गाडीवर सुमारे १८ ते २० वयातील ६ अज्ञात इसमांनी अचानक त्यांच्या जवळ आपली गाडया थांबविल्या तोंडाला स्कार्फच्या साहाय्याने लपवुन ठेवलेल्या या इसमांनी अरविंद यांना शिवीगाळ करून त्यांच्या कडे असलेल्या चाकुचा धाक दाखवुन अरविंद यांना गल्ल्यातील पैसे दे म्हणुन धमकाविण्यास सुरवात केली…अरविंद यांनी सदर इसमांना विरोध करण्याचा प्रयत्न सुरू केला तोच अज्ञात इसमां पैकी एकाने अरविंद यांच्या उजव्या हातावर चाकुने हल्ला करून करून गंभीर जखमी केले आणि इतर साथीदारांनी अरविंद याच्या गल्ल्यामधील दिवसभराची कमाईचे पैसे घेवुन सर्व अज्ञात इसमांनी पळ काढला, त्या नंतर अरविंद यांना जवळच्या सना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले,सदर घटनेची बातमी मिळताच कोंढवा पोलिसांनी गंभीर दखल घेत, सदर आरोपींची शोध मोहीम सुरू केली आणि घटना घडल्या ठिकाणी जवळच असलेल्या गॅरेजच्या सी.सी.टी.व्ही च्या साहाय्याने ३ गुन्हेगारांना अटक केली त्यांच्या या तत्पर उत्कृष्ट कामगिरीचेसर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सदरील कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे पोलिस निरीक्षक मोगले, ए.पी.आय. अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार जयदेव भोसले, पोलीस अंमलदार सुहास मोरे, गणेश चिंचकर, अमोल हिरवे, राहुल रासगे, रत्नपारखे, विकास मरगळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल