पुणे महानगरपालिका परीक्षा होणार ‘या’ तारखेला.. हॉल तिकीट आत्ताच करा डाऊनलोड…..!
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन):- पुणे महानरपालिकेच्या रिक्त पदासाठी मेगाभरती जाहीर करताच इच्छुक उमेदवारा कडून अर्जांचा जणू वर्षावच झाला, त्यात अधून मधून येणारे परीक्षा आणि भरती संबंधीचे घोटाळ्या संबंधीचे बातम्या ज्या मुळे परीक्षेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता पुणे महानगरपालिका कडून संबंधित परीक्षेचे कामकाज आय.बी.पी.एस. संस्थेकडे सोपवली त्यातच परीक्षा लांबणीवर पडण्याची देखील शक्यता दर्शवली गेली पण आखेर पुणे म.न.पा. ने आखेर परीक्षेची तारीख जाहीर केली असून प्रवेश पत्र आपल्या सांकेतिक स्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट https://pmc.gov.in/mr/recruitments व https://pmc.gov.in/en/recruitments लिंकवरून उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
उमेदवारांसाठी महत्वाचे :-
- परीक्षेकरिता संबधित उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र धारण करणे आवश्यक आहे.
- परीक्षेच्या किमान ७ दिवस अगोदर परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होण्यासाठी SMS/ Email द्वारे युजर आयडी व पासवर्ड पाठविण्यात येणार आहे.
*प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यास काही अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्र. १८००२२२३६६, १८००१०३४५६६ किंवा हेल्पलाईन लिंक http://cgrs.ibps.in वर संपर्क साधावा.
*परीक्षेच्या वेळी उमेदवाराकडे परीक्षा प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षेकरिता प्रवेश नाकारला जाईल आणि त्याची सर्वस्वी जवाबदारी उमेदवाराची राहील.
*परीक्षा केंद्र व वेळ प्रवेशपत्रावर नमूद नमूद करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेत मेगाभरती जाहीर होताच इच्छुकांकडून अर्जही मागवण्यात आले होते. दरम्यान, 448 जागांसाठी एकूण 87 हजार 471 उमेदवारांनी आतापर्यंत शुल्कासहित अर्ज दाखल केले आहे. या भरती प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा ऑक्टोबर महिन्यात पार पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. त्यानंतर पुढील निवड प्रक्रिया पार पडेल.