कोंढव्यात (पुणे) लंपी विषाणूचे आगमन…..!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन):- भारतात लंपी व्हायरस (Lampi Virus) भलतेच हात-पाय पसरले आहे, त्यातच ११ सप्टेंबर रोजी सदर झालेली अहवालात पुण्यातील कोंढवा परिसरात देखील गाईला लंपी विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे काहीकाळा साठी तरी कोंधव्यातील कत्तलखान्याना कुलप लावण्यात आले आहे.हा एक विषाणूजन्य त्वचारोग आहे, ज्याचा धोका, गो व महिष या वर्गातील जनावरांना जास्त असून हा आजार कॅप्री पॉक्स या विषाणू प्रवर्गातील आहे. लंपी आजाराची लक्षणे ज्यात जनावरांच्या शरीरावर गोल आकाराच्या गाठी येतात. त्या कड्क गाठी असतात, जनावरांच्या रक्तात लंपी विषाणू हा 1 ते 2 आठवडे राहतो, लंपी हा आजार सर्व वयाच्या गाई व म्हशी यांना होत आहे. लहान जनावरांना हा आजार जास्त प्रमाणात होत आहे. लंपिच्या वाढता प्रदुर्भाव लक्षात घेऊन कोंढव्यातील ५ किलोमीटर परिसरातील ६०० पेक्षा अधिक जनावरांचे लसीकरण करण्यात आहे.लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या आजाराबाबत मोठी घोषणा केली आहे. लम्पी आजारामुळे आता जनावरांसाठी क्वारंटाईन सेंटर (Quarantine Center for Animals) सुरु करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.लम्पी आजारासाठी लशीचा पुरेसा साठा उपलब्ध असून. या आजाराने ज्या लोकांचे जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत त्यांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषाप्रमाण राज्य सरकार मदत करेल. महाराष्ट्र राज्यात शासनाच्या वतीने लंपी(Lumpy) या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राज्य सरकारांना लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या जनावरांना लंपी या रोगाची बाधा होण्यापूर्वी त्यांचे लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून आपल्या जनावरांना लंपी या रोगाचा धोका निर्माण होणार नाही.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *