कोंढवा – अर्धवट कामाला मार्गी लावण्यासाठी आसमा खान यांचा पुढाकार…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): मक्का मशीद शेजारी,शिवनेरी गल्ली नं. १, कोंढवा खुर्द परिसरात संबंधित बांधकाम धारकाकडून बांधकामाचा नारळ फोडून खोदकाम करण्यात आले पण…आपण एक काम सुरू केले आहे जे पूर्णत्वाच्या मार्गी लावायचे आहे हे त्या कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित मालक विसरले की काय ..? कारण आज उद्या मध्ये खोदकाम केलेल्या जागेत पावसाचे पाणी साठून साठून अक्षरशः तेथे गाळ निर्माण झाला आहे, साठलेला कचरा, डास यांचा नवीन साम्राज्यच या ठिकाणी तयार झाले, खोदकामा मुळे नागरिकांना जाण्या-येण्या साठी देखील पुरेसा रस्ता उरलेला नाही, साठलेल्या पाण्यातून येणारा दुर्गंध, डास,किडे या मुळे मलेरिया, डेंग्यू ला जणू होऊन दिलेले आमंत्रण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे

गाळ

नागरिकांच्या या सर्व गैरसोयी आणि त्यांच्या जीवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेत आखेर सामाजिक कार्यकर्ती आसमा खान यांनी पुढाकार घेतला आणि सदर ठिकाणची पाहणी करून संबंधित कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम मालकाला “सदर अर्धवट कामाला २ दिवसात मार्गी लावा… जर २ दिवसात कोणती दखल घेतली गेली नाही तर पुणे महानगरपालिकेच्या साहाय्याने योग्य ते पाऊल उचलण्यात येईल” असे आवाहन (सामाजिक कार्यकर्ती) आसमा खान यांनी फेसबुक माध्यमातून (लाइव्ह) दिले आहे.

आस्मा खान – समाजसेविका – https://m.facebook.com/story.php?story_fbid=882815345911525&id=100042808549995&sfnsn=wiwspmo

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल