कोंढवा – बिनबुडाच्या वक्तव्या विरोधात निषेध आंदोलन…!- ॲड. हाजी गफुर पठाण

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): गुढीपाडवा मेळाव्यात (०२ एप्रिल) रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मुस्लिम समाज, अजान, मस्जिद, मदरसा या विरोधा जे काही बिनबुडाचे वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावनेला गंभीर इजा पोहचवली आहे, आणि राष्ट्रीय एकात्मतेत द्वेष निर्माण होईल अश्या वक्तव्यावर मुस्लिम समाज तसेच कोंढवा येथील नागरिकां मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी निर्माण झाली आहे परिणामतः कोंढवा खुर्द येथील नगरसेवक ॲड. हाजी गफुर पठाण यांच्या वतीने, राज ठाकरे यांच्या वक्तव्या विरोधात दिनांक ०८ एप्रिल (शुक्रवार) रोजी दुपारी २:३० वा. कोणार्क इंद्रायू मॉल समोर, कोंढवा खुर्द, पुणे येथे निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांच्या वक्तव्या नंतर समाजात वावरताना हिंदू – मुस्लिम मध्ये निर्माण झालेल्या तेडेची झळ देखील कुठे ना कुठे प्रत्येकाला जाणवू लागली आहे, जे अनेक वर्षापासून एकत्रितरित्या गुण्या गोविंदाने राहत होते त्यात या वक्तव्याने फूट निर्माण झाली आहे, पण काही होता पूर्वी सारखी या एकतेला जी भारताची सुंदरता आहे ती कोणत्याही बेताल वक्तव्याला बळी न पडता पुढे देखील अजरामर राहावी म्हणून सर्वांना एकत्रित येवून भारतीय एकनिष्ठता दाखवणे अत्यंत गरजेचे आहे,

” भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला जातीभेद न करता सामान हक्क, अधिकार दिले असताना अश्या प्रकारचे वक्तव्य का..? कोंढवा मध्ये जेथे प्रत्येक धर्माचे सन, महापुरुषांची जयंती – पुण्यतिथी, सोहळा सर्व धर्म मिळून मिसळून साजरी करतात आज पर्यंत कोणत्याही प्रकारचा द्वेष त्या संबंधी निर्माण झाला नाही, आज पर्यंत आणि पुढेही मदरसा, मस्जिद मध्ये कुठल्याही प्रकारचे चुकीचे काम झाले नाही किंवा होण्याची शक्यताच नाही तर काही वोट मिळविण्यासाठी बेताल वक्तव्य करून दोन समाजात द्वेष निर्माण करण्याचा का प्रयत्न केला जात आहे, कोंढवा नगर सेवक ज्यांना मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील लोकांनी आपल्या मतांनी विजय मिळवून दिला ते नगर सेवक आज त्याच मुस्लिम समाजाच्या विरोधात असलेल्या वक्तव्या वर जेथे दोन समाजात मोठी फूट निर्माण झाली त्या वर ” मी नाराज असण्याच कारणच नाही, मी राज ठाकरेंचा समर्थन करतो” असे स्पष्टीकरण देतात याची मला लाज वाटते – ॲड. हाजी गफुर पठाण.

ॲड हजी गफुर पठाण

वक्तव्या नंतर निर्माण झालेल्या म.न.से पक्षा बद्दल कोंढवा आणि इतर मुस्लिम समाज मध्ये नाराजगी निर्माण झाल्याने यापुढे म.न.से पक्षाच्या राजकीय वाटचालीवर याचा मोठा परिणाम दिसू शकतो.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल