चला….हफ्ता काढा.!” कोंढवा आणि एम जी रोड, कॅम्प मधील विक्रेत्यांवर ….

“खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): मिठानगर कोंढवा खुर्द आणि एम.जी रोड-कॅम्प ज्या परिसरात मुख्य:त किरकोळ व्यापारी, फळ-भाजी विक्रेते, दैनंदिन आवश्यक वस्तू विक्रेते आपल्या उदरनिर्वाहासाठी कर्ज काढून, आपले सोने तारण ठेवून त्या १०-२० हजारतून भांडवल करून सकाळ ते रात्री पर्यंत मेहनत करतो आणि त्यात “चला हफ्ता काढा…” “इथे व्यवसाय करायचं असेल तर पैसे द्यावे लागेल..”, म्हणून विक्रेत्यांना दादागिरी करून जबरदस्ती, फुकट पैसे खाणाऱ्या लोकांत देखील मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. महामारी, काळात नोकरी गमावलेला प्रत्येक जण आपला संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी किरकोळ व्यापारा कडे वळला आहे पण त्यात ही गतिरोधक म्हणून काम करणाऱ्या भाई लोकांनी उच्छाद मांडला आहे. अलीकडेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती ज्यात ‘एखाद्या कार्यालयाच्याखाली एखादा व्यक्ती भजी विकत असेल तर तो रोजगार मानू नये काय?’ असा सवाल त्यांनी केला होता, म्हणजेच ‘भजी बनवण्याच्या पथारी व्यवसाय हा देखील रोजगार’ अशी व्याख्या त्यांनी केली खरी पण त्या पलीकडे अतिक्रम विभागामार्फत वेळोवेळी होणारी कारवाई, उचलून नेण्यात येणाऱ्या हातगाड्या, विक्रीसाठी आणलेले माल मग ती सोडवण्यासाठी निर्माण होणार दंड भरणा हे देखील आलेच, तर या पथारी व्यावसायिकांच्या खिश्यात उरले काय..? नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे पुणे, एम.जी रोड, कॅम्प, परिसरात असणारी विशेष एका बाजू कडील पथारी व्यावसायिकां वरच फक्त कारवाई केली जाते, तर दुसऱ्या बाजूने आलेल्या व्यावसायिकांवर कारवाईची झळ लागू दिली जात नाही, याचे कारण फक्त आणि फक्त त्यांना असणारा राजकीय पाठिंबाच होय…जरी अतिक्रमान विभागाची कारवाई कायदेशीर प्रक्रिया म्हणावी लागली तरी या गरीब लोकांनी रोजगार साठी कोणता पर्याय निवडावा.. दिवसभराच्या मेहनतीतून जो काही नफा होतो त्यातून ५०% रक्कम ही गुंड प्रवृत्तीचे लोक हफ्त्याच्या नावाखाली या विक्रेत्यांकडून हिसकावून घेतात,स्वनिर्मित गुन्हेगारी टोळीचा धाक दाखवून “इथे व्यवसाय करायचं असेल पैसे द्यायचे नाही तर इथे थांबायचे नाही..” म्हणून अश्या किरकोळ विक्रेत्यानं कडून जबरदस्ती दादागिरी करून पैसे उकळून घ्यायचे आणि जर पैसे देण्यास विरोध केला तर त्यांना शिवीगाळ, मारहाणही केली जाते, विक्रेत्यांना आपल्या कमाईचा आदण बनवणारे हे लोक कोण..? यांची दादागिरी का..? त्यांना पोलीस खात्याची भीती वाटत नाही का? यांना विक्रेत्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे का म्हणून द्यायचे..? तरी महानगरपालिकेने याची दखल घेऊन अश्या पथारी व्यावसायिकांसाठी विशिष्ट योजना, व्यवसायासाठी एक विशिष्ट जागा नेमणे आवश्यक आहे. अतिक्रमण विभागाच्या कायद्याचा उल्लंघन होणार नाही शिवाय या किरकोळ विक्रेत्यांना सुरक्षितपने व्यवसाय करता येईल.अलीकडेच कोंढवा पोलिस स्टेशन कडून अश्याच प्रकारे पान टपरी आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडून धमकावून पैसे उकळून घेणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अश्याच प्रकारची दखल घेऊन उत्तम कारवाई पोलिस विभागाकडून सुरू राहिली तर लवकरच अश्या गंभीर गैरप्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल अन्यथा अश्या फुकट खाऊ, गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या संख्येत वाढच होत राहील..

विक्रेत्यांसाठी : आपल्या मेहनतीच्या पैशावर हफ्ता म्हणून कमाई करणाऱ्या लोकांना, त्यांच्या दादागिरीला न घाबरता आपल्या कडून जेव्हाही असे लोक पैश्याची मागणी करतील तर त्याच्या विरोधात कोंढवा परिसरातील पीडित व्यावसायिक ‘कोंढवा पोलीस स्टेशन’ मध्ये तर एम. जी रोड परिसरातील व्यावसायिकांनी ‘लष्कर पोलीस स्टेशन ‘ मध्ये तक्रार नोंदवू शकतात जेणे करून अश्या गैरप्रकाराला आळा बसवण्यासाठी पोलीस विभागास मदत होईल.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल