पुणे आणि इतर जिल्ह्यातील निवडणूक ६ महिन्यानंतर…?

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : निवडणुकी च्या उत्साहावर ६ महिन्यासाठी विरामचिन्ह लागण्याची शक्यता दर्शवली जात आहे, कारण हे की ओ.बी. सी आरक्षणावर तोडगा काढण्याच्या हेतूने आज विधानसभेत विधेयक मांडण्यात येणार आहे राज्य सरकार निवडणूक आयोगाचे काही अधिकारी घेणार आहे, आणि त्या मुळे ओबीसी आरक्षणापर्यंत सर्व निवडणुका 6 महिने पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. ज्याचा परिणाम पुणे, मुंबई,औरंगाबाद जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकांवर होणार आहे परिणामी या जिल्ह्यांतील निवडणुका 6 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात येणार आहेत.थोडक्यात निवडणूक पुढे ढकलण्याचे कारण :

  • ओबीसी आरक्षण लागू होण्यास मदत होईल.
  • सरकार कडून प्रभाग आणि वॉर्ड रचनेचे अधिकार आपल्याकडे घेण्याचं विधेयक मांडणार आहे.
  • सदर विधेयक पारित झाल्यावर सरकार प्रभाग रचनेसाठी 6 महिने घेऊ शकेल
  • ज्या काळामध्ये सरकार इंपेरिकल डेटा गोळा करेल.पर्यायी 6 महिने प्रशासक नेमून कामकाज चालू दिल जाईल आणि निवडणुका 6 महिने पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे..

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल