रशिया-युक्रेन युद्धाने घेतला भारतीय विद्यार्थ्याचा बळी….!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : रशिया आणि युक्रेन मधील चालू असलेल्या युद्धाची पार्श्वभूमीवर भारतासाठी अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. रशिया- युक्रेनच्या युद्धामध्ये खारकिव शहरातील गोळीबारामध्ये एम.बी.बी.एस चे शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्यास आपला जीव गमवावा लागला आहे भारताचे परराष्ट् मंत्रालयाचे सचिव अरींदम बागची यांनी ट्विटच्या माध्यमातून ही दुःखद बातमी दिली आहे. मृत्यू झालेला शेखरप्पा ग्यानगौडा नवीन (मूळचा चलागेरी, कर्नाटक राज्य) हा एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचा विद्यार्थी होता. रशियन सैन्या कडून युक्रेन खरकिव येथील शासकीय इमारतीवर मिसाईल हल्ला करण्यात आला त्या वेळेस झालेल्या गोळीबारात या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला,अरींदम बागची यांनी ट्विटच्या माध्यमातून सदर भारतीय विद्यार्थीच्या कुटुंबीयांना भारताची संवेदना देखील व्यक्त केली, भारता कडून विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार कडून युक्रेन मधील विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेन सोडावे असे आदेश देखील देण्यात आले आहे, परंतु युक्रेन मधील खारकिव हा एक असा प्रांत आहे की ज्या पासून पोलंड, रोमानिया, हंगरी यांच्या सीमा दूर असल्यामूळे या सीमां पर्यंत पोहोचण्यासाठी या विद्यार्थ्यांना खरकीव मधून पूर्ण युक्रेन चा प्रवास करावा लागतो ज्या पूर्ण भागात युद्ध सुरू आहे आणि ज्या मुळे भारतीय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून हा प्रवास करावा लागतो आणि याच प्रयत्नात अखेर एक भारतीय विद्यार्थ्याला मृत्यूला सामोरे जावे लागले ही भारतासाठी अत्यंत दुर्देवी बातमी आहे. युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्या साठी भारता कडून ऑपरेशन “गंगा” राबवण्यात आले असून आत्ता पर्यंत १००० विद्यार्थ्यांना दिल्ली, मुंबई सारख्या शहरं मध्ये आणण्यात आले आहे, परंतु अजूनही काही भारतीय विद्यार्थी या शहरांमध्ये अडकून आहेत.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल