आणखी एक निर्भयाचा मुंबईत मृत्यू..! साकीनाका बलात्करपीडित महिलेची मृत्यूशी झुंज आखेर अपयशी, निर्भयाच्या दोन मुली पोरक्या

मुंबई ( खादी एक्सप्रेस ऑनलाइन) : काल रात्री ३ च्या सुमारास मुंबई साकीनाका परिसरात घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेतील महिला पीडितेने आज राजावाडी रुग्णालयात आखेर चा श्वास घेतला. मृत्यू ची माहिती मिळताच मृत महिलेच्या २ मुली रुग्णालयाच्या आवारात सैरावैरा फिरू लागल्या. या घटने ने दोन्ही मुलींच्या डोक्यावरून मायेचे छत्र हिरावून घेतला आहे. ३० वर्षीय महिलेचा बलात्कार, नंतर तिच्या गुप्तागावर लोखंडी रॉड ने अमानुष मारहाण केल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली होती . या घटने मध्ये महिला अतिशय गंभीर होती. डॉक्टरनी दिलेल्या माहिती नुसार महिलेच्या आतड्या पूर्ण पाने जखमी झाले होते .आखेर आज सकाळी पीडितेने आखेर चा श्वास घेतला. या लज्जास्पद आणि संताप जनक घटने ने संपूर्ण राज्यात आक्रोश निर्माण झाला आहे. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा द्या ही मागणी लोकं कडून केली जात आहे.” लवकरात लवकर सर्व आरोपी आणि ज्यांचा रेमोटली ही या प्रकरणाशी संदर्भ असेल आश्या सर्वांना अटक करून फास्ट ट्रक कोर्टाच्या माध्यमातून आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, नराधमांना फाशिच झाली पाहिजे ” असे व्यकतव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.” सावित्री च्या लेकी सुरक्षित का ..? मुर्दाड सरकार साठी हा फक्त एक आकडाच”अश्या शब्दात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपले राग व्यक्त केला . निर्भया प्रकरणाची पुनरावृत्तीच झाली हे खरे आणखी किती निर्भया अश्या घटनांना बळी पडणार आहे ? आजूनही कायदिया न्यायव्यवस्थेला जाग नाही येत आहे का ?