वानवडी गँगरेप प्रकरणातील आणखी ८ आरोपी अटक, २ आरोपी रेल्वे कर्मचारी निलंबित !

पुणे ( खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ): चर्चेत असलेल्या वानवडी येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार घटनेतील आणखी ८ आरोपींना बेड्या ठोकण्यात पुणे पोलिसाना यश आले आहे . ६ आरोपी सोबत २ आरोपी हे रेल्वे कर्मचारी आहे प्रशांत स्यमियाल गायकवाड ( टी एल अँड एसी , विद्युत विभाग , पुणे स्थानक ) आणि राजकुमार रमनगिना प्रसाद ( इलेक्ट्रिक आणि देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) या दोघांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असल्याची शक्यता दर्शवली जात आहे. पीडित १३ वर्षीय मुलगी ३१ ऑगस्ट रोजी आपल्या मित्रा सोबत मुंबई ला जाण्यासाठी एकटी घरातून निघाली होती ते दोघे पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर भेटणार होते पण पिडीतेचा मित्र तिथे आला नाही. बराच वेळ रेल्वे स्टेशनवर एकटी उभी असल्याचे पाहून आरोपी रिक्षा चालक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी आम्ही तुझी राहण्याची व्यवस्था करतो असे सांगून तिला विश्वासात घेतले . रिक्षा चालकाने आपली मित्रांना फोन करून बोलवून घेऊन पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊन २दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला ही घटना ३१ ऑगस्ट ते १सप्टेंबर दरम्यान घडली . दोन दिवसानंतर आरोपींनी तिला मुंबई कडे जाणारी बस मध्ये बसवून दिले . तिथे ती तिच्या मित्रा सोबत होती . नंतर ते दोघे चंदिगढ येथे गेले . मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी शोध मोहीम सुरू केले . मोबाईल लोकेशन च्या सहायाने पोलिसांनी मुलीचा शोध घेतला . शोधा दरम्यान मुलीचे रिक्षात बसतनाचे सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना मिळाले . पीडित मुलीने सर्व घटना पोलिसाना सांगितली . ही सर्व घटना ५ सप्टेंबर रोजी उघडीस आली . पीडितेला या घटने बद्दल वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी युद्पातळीवर आरोपीचा शोध सुरू केला या आधी ही रिक्षा चालक आणि त्याच्या आरोपी मित्रांना पोलिसांनी अटक केली . चौकशी नंतर आणखी ८ आरोपींना अटक करण्यात आले .

मशाक अब्दुलमजिद कान्याल (वय २७, रा. वैदुवाडी, हडपसर)
अकबर उमर शेख (वय ३२, रा. जुना बाजार, मंगळवार पेठ)
रफिक मुर्तजा शेख (वय ३२, रा. मंगळवार पेठ)
अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (वय २७, रा. कासेवाडी)
प्रशांत सॅमियल गायकवाड (वय ३२, रा. ताडीवाला रोड)
राजकुमार रामनगीना प्रसाद (वय २९, रा. घोरपडी गाव)
नोईब नईम खान (वय २४, रा. बोपोडी)
असिफ फिरोज पठाण (वय ३६, रा. लोहीयानगर)

त्या पैकी दोन रेल्वे कर्मचारी आहे. या घटने मुळे स्त्री सुरक्षितते वर प्रश्न निर्माण झाला आहे सोबतच लोकं कडून पोलीस खात्या बद्दल आक्रोशही व्यक्त केला जात आहे . आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी हीच मागणी सर्व कडून केली जात आहे .

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर कॉमेंट करू शकता.

आपल्या भागातील समस्या आणिउपक्रमांची माहिती आमच्या ७२७६२९८८८५ याक्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक,आणि ट्विटर वर फॉलो करा…!

व्हॉट्सअँप ग्रुप ची लिंक : https://chat.whatsapp.com/H3g9zIalg8y7Y2yg868s5t

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक:https://www.facebook.com/Khadi-Express-104927461897754/

आमच्या ट्विटर पेज’ची लिंक:https://twitter.com/KhadiNewsExp?t=_wvCUFaT5m_FWp56Lx4ICQ&s=08

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल