अबब…महानगरपालिके चा आरोग्य विभागाचा अधिकारी ५ हजारांच्या लाचे साठी पडला आजारी…

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी : सरकार कडून आपल्या कामाचा मोबदला, वेतन मिळत असताना देखील लोभी प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांची लाच घेण्याची घाणेरडी वृत्ती काही संपुष्टात येत नाही. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करून आपल्या हाताखाली काम करणाऱ्या गरजू कर्मचाऱ्यांन कडून पैशाची मागणी केली जाते .अश्याच एका अधिकाऱ्याला पुण्याच्या लाच लुचपत विभागा ( Anti corruption Bureau pune ) कडून बेड्या ठोकल्या गेल्या आहे .पुणे महानगरपालिकेच्या येरवडा क्षेत्रीय कार्यालय मध्ये आरोग्य निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्नील कोठावळे यांना लाच घेताना आज ( गुरवार दि. ११ नोव्हेंबर ) ए. सी. बी. कडून सापळा रचून अटक करण्यात आले. कचरा गोळा करण्यासाठी ठराविक ठिकाणी डयुटी देण्यासाठी कर्मचाऱ्यां कडून पैशाची मागणी कोठावळे करीत असत. आखेर या मागणी बाबत कर्मचाऱ्याने पुण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या बाबत तक्रार दिली .तक्रारीची शहानिशा करून आखेर ए. सी. बी. कडून आज रोजी स्वप्नील कोठावळे यांना ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडुन बेड्या ठोकण्यात आले. संबंधित प्रकरणामुळे कोठावळे यांना निलंबित करण्यात आले आहे. तक्रारी नुसार संबंधित प्रकरणाची दखल तपास पथक पोलीस निरीक्षक- श्रीराम शिंदे, म पो शि पूजा पागिरे, पो,शि.अंकुश आंबेकर, पो.शि. सौरभ महाशब्दे चालक पो.ना. दिवेकर ला.प्र.वि.पुणे युनिट . यांस कडून तर संपूर्ण कारवाई श्री राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि पुणे परिक्षेत्र.श्री सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,लाप्रवि पुणे.
श्री सुहास नाडगौडा,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि पुणे. यांच्या मार्गदर्शना खाली ए. सी. बी च्या पथका कडून करण्यात आली.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल