” होता सोन्याचा संसार ” – कोंढवा गुंठेवारी अनाधिकृत बांधकाम धारकामुळे हक्कदार लोकांना घर सोडण्याची वेळ
पुणे (खादी एक्सप्रेस प्रतिनिधी) : ऑनलाईन, भेटून,प्रत्यक्षात म. न. पा. अतिक्रमण विभागाकडे कोंढवा येथील गुंठेवारी मधील अनाधिकृत बांधकाम कार्यवाही झाल्यानंतर देखील परत बांधकाम करणाऱ्या विरुद्ध सध्या मनपाच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रारी वाढत असून या तक्रारीवर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. पारगेनगर पुणे येथे ज्या प्रकारे अतिक्रमण विभागाने कार्यवाही केली. त्याप्रकारे कोंढवा येथे कार्यवाही करण्यात आली नाही. कोंढवा येथे कारवाई करताना फक्त होल, खड्डे करण्यात आले. मुळासकट सदरील बांधकाम पाडले गेले नाही. दोन मजली बांधकाम झाल्यानंतर ज्या बिल्डिंगला खड्डे पाडण्यात आले ती बिल्डिंग नंतर सात मजल्याची झाली आणि ही सात मजली अनधिकृत बिल्डिंग झाल्यामुळे शेजारच्या लोकांचा नैसर्गिक हक्क ऊन, वारा, पाऊस यावर गदा आली. टेम्पल टॉवर व शॉलम हाईटस्, केन्ट हिल व्हिव, वजिर कासकेड या बिल्डिंग मधील संपर्क केल्यानंतर या लोकांनी त्यांचे अनुभव कथन करताना सांगितले की, सदरील घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची वेळ आलेली आहे. कारण की
१) शेजारच्या घरातील टि. व्ही.आपल्या घरात ऐकू येतो
२) शेजारच्या घरातील कौटुंबिक भांडणे आपल्याला ऐकावे लागतात.
३) लहान मुलांचे आरडा ओरड ऐकावे लागते.
४) तसेच लोक आपल्या घरात जे धार्मिक विधिी पार पाडतात त्यात देखील व्यत्यय येतो.याशिवाय दिवसा ढवळा लाईट लावावे लागते, घरात अंधार होतो.
५)स्वतःच्या खाजगी जीवनावर गदा आलेली आहे.
परंतु शासनाने याकडे लक्ष देण्यास तयार नाही. तक्रार करण्यास गेल्यावर शेजाऱ्याचे दुश्मनी आयुष्य भरासाठी कोण घेणार? पोलिसांकडे गेल्यार तक्रार घेणार की नाही घेणार याची भिती आहे. तसेच राजकीय नेते व नगरसेवक सदरील वाद हा आपसातच मिटवतात अशा विविध कारणे या लोकांनी सांगीतलेले आहेत काही लोक तर सदरील भाग सोडून जात आहेत. त्यामुळे होता सोन्याचा संसार अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे.
“कोंढवा गुंठेवारी मध्ये अनाधिकृत बांधकाम करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांच्या विरोधात कार्यवाही करणारे जिगरबाज पोलीस कर्मचारी १) मा. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे २) मा.पोलीस उपनिरीक्षक पाटील ३) सोपानगिरी बर्गे ४) मा. सहाय्यक पोलीस फौजदार डोईफोडे ५) मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते ६) पोलीस उपनिरीक्षक खेतमाळस ७) पोलीस उपनिरीक्षक कापुरे ८) पोलीस उपनिरीक्षक चाबुस एम. आर. टी. १९६६ चे कलम ४३ व ५२ लावून अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांविरुद्ध प्रकरणे दाखल करण्यात आलेली आहे.लवकरच या धडाकेबाज पोलिसांची कामगिरी, त्यांची भूमिका, त्यांचे मत, अनधिकृत बांधकाम हटवताना त्यांना आलेले अनुभव लवकरच ‘खादी एक्सप्रेस’ आपल्या समोर मांडणार आहे “
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणिउपक्रमांची माहिती आमच्या ७२७६२९८८८५ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला फेसबुक,आणि ट्विटर वर फॉलो करा…!आमच्या फेसबुक पेज’ची लिंक: https://www.facebook.com/Khadi-Express-104927461897754/
आमच्या ट्विटर पेज’ची लिंक:
https://twitter.com/KhadiNewsExp?t=_wvCUFaT5m_FWp56Lx4ICQ&s=08