हे काय….! चक्क पुणे, पिंपरी महापालिकाच गुंठेवारी फसवणुकीच्या जाळ्यात …..
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) :- चालूपरिस्थितीत फसवणुकीचे वारे चांगल्याच वेगात आल्याने, फसवणूकी पासून पिंपरी आणि पुणे महानगरपालिका देखील वाचू शकली नाही, दस्त नोंदणीसाठी बनावट गुंठेवारी, बनावट कागदपत्रे, बनावट अकृषिक दाखले (N.A) तयार करून हडपसर मेगा सेंटर येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तची नोंदणी करत असल्या प्रकरणी बऱ्याच तक्रारी आल्या त्या अनुषंगाने पडताळणी पथक नेमण्यात आले आणि सदर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यावर या प्रकरणी १९ जणांच्या विरोधात पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले आहेत.खासगी दलालांनी राज्य शासनासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या बांधकाम विभागाची फसवणुक करत असल्याचे उघडकीस आले आहे. अशी फसवणूक करणाऱ्या लोकांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने तपासासाठी विशेष पथक कार्यान्वित केले जाणार असून, सदर प्रकरणासंबंधी हडपसर पोलीस ठाण्यात विष्णु तुकाराम आमले (रा. फुरसुंगी) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून, नंदा नामदेव निंबाळकर, अमोल नामदेव निंबाळकर, अजित नामदेव निंबाळकर, सोनाली अतुल निंबाळकर आणि महेश ओमप्रकाश धुत (रा. लेकटाऊन सोसायटी, कात्रज ) तसेच त्यांना बेकायदा कामासाठी मदत करणाऱ्या दलालांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या टोळीत आणखीनही काही साथीदार सहभागी असल्याचे नाकारता येत नाही, शासकीय कर्मचाऱ्यांचा यात हस्तक्षेप आहे किंवा नाही यावर सध्या जरी प्रश्न चिन्ह आला तरी त्यावर देखील तपास पथक आपली कामगिरी दाखविणार आहे,
महापालिकेच्या हडपसर कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या दस्तास जोडण्यात आलेल्या कागदपत्रांच्या सत्यता, वैधता कायदेशीर बाबींसाठी तसेच खोटे आढळल्यास नोंदणी अधिनियमाचे कलम ८२ अन्वये संपूर्ण जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे. ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले असून, या व्यवहारात सहायक दुय्यम निबंधक आणि पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाची फसवणूक करण्यात आली आहे.
फसवणूक आणि गुन्हे नोंद :-
:- बनावट एन ए दाखले जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सावळाराम भिमाजी कऱ्हे, सीताराम कऱ्हे, मंगल कऱ्हे, मंगल कोळपे, अंजना बापू कोळपे, बायडाबाई जालींदर मिसाळ, लता राजाराम कोळपे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
:- बनावट गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रकरणाचा दाखल जोडून दुय्यम निबंधक व पिंपरी चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांची फसवणूक केल्याबद्दल अरुण कृष्णा अल्हाट, पुष्पवती सोनवणे, विजया मुकुंदा साळवे, कल्पना खंडुजी कदम यांच्यातर्फे कुलमुख्यातर म्हणून सुशांत अनिल पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला
:- सिद्धनाथ डेव्हलपर्सतर्फे जहाँगीर हुसेन हमजुद्दीन मुल्ला (रा. आंबेगाव बु़) यांच्या विरोधात आणि श्री साई स्वराज डेव्हलपर्सतर्फे भागीदार पोपट बबन पायगुडे (रा. कात्रज) आणि हेमचंद सोमनाथ भाटी (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
:- दस्ताला बनावट दाखले जोडून उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची फसवणूक केल्याप्रकरणी समीर गोविंद कडू (रा. सुखसागरनगर, कात्रज) व त्यांना मदत करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
:- सातव पाटील एंटरप्रायसेस तर्फे निखील किसन सातव (रा. वाघोली) आणि त्यांना मदत करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपास पथकाच्या समितीने अहवाल दिल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहे