सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकतेय समाजातील एकता-शांतता…! व्हिडिओ पहा
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): प्रत्येक नाण्याची दोन बाजू ही म्हण आता सोशल मीडियावर देखील लागू होण्यास सुरवात झाली आहे, लहान – मोठे, तरुण सर्वच जण सोशल मीडियाला आहारी गेले आहेत.तरुणाई रोजचे काही तास लोकप्रिय सोशल साइट्सवर घालवतात. या साइट्स म्हणजे केवळ गप्पा मारण्याचं किंवा फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचं माध्यम नाही, तर आपल्या रोजच्या आयुष्यावर प्रभाव पाडणारं/परिणाम करणारं माध्यम बनलं आहे, अगदी आपल्या करिअरवरही, पाहिले तर सोशल मीडिया मुळे सर्वांचे दैनंदिन काम बरेच सोपे केले आहे ज्या मुळे वेळेची देखील बचत होते, पैसे, कागदपतत्रे, फोटो, व्हिडिओ, संदेश सर्वच एका क्लिक वर दूरवरच्या अंतरावर पोहोचते…पण हीच माहिती जर खोटी असेल तर ….? प्रत्येक जण मिळालेली माहिती खरी की खोटी याची शहानिशा न करता त्या व्हिडिओ किंवा संदेशाला आपल्या परिजनांपर्यंत मिनटात पोहचवितात.. पण असे करण्यापूर्वी फक्त एकदा विचार करा की जी माहिती आपण पुढे पोहचवत आहे ती कितपत खरी आहे… आता हेच पहा….
या व्हिडिओ मध्ये सुरवातीला बघणाऱ्यांना वाटेल की हा चिमुरडा कसा जीवघेणा खेळ करत आहे, मनात एका मिनिटाला हे ही वाटते की तो मुलगा तेथे गेला कसा..? कोण सोशल मीडिया वरील लाईक साठी त्या छोट्याश्या जीवाशी खेळत आहे..? त्याचे घरचे लोक किती निष्काळजी आहेत..? पण सत्य बाजू तर दुसरीच आहे पाहिले गेले तर तो छोटासा मुलगा एका बागेत खेळत आहे पण व्हिडिओ एडिटिंग सॉफ्टवेअर चा गैरवापर करून त्याला एका दुसऱ्याच ठिकाणी उभे केले… या माहिती प्रदर्शित करण्याचा खादी एक्सप्रेसचा एकच हेतू आहे कोणत्याही व्हायरल व्हिडिओ, संदेश, बातमी पुढे पाठविण्या पूर्वी ती कितपत खरी आहे त्या बातमीचा समाजातील एकता, शांततेवर कितपत परिणाम होईल, या खोट्या बातमी मुळे दोन गटांमध्ये वाद, एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होईल का याचा ही विचार करा, खरी आणि समाजाला फायदा होईल अशीच माहिती पुढे पोहचवा आणि अश्याच गोष्टींवर विश्वास ठेवा.
कारण अश्या खोट्या बातमी अफवांमुळे माहिती बनविणारा व्यक्ती दूर राहतो, तो खोटी माहिती बनवून कदाचित विसरून ही जात असेल या कदाचित आपला स्वार्थ साध्य करत असेल पण याचा परिणाम हा समाजात एकत्रित पणे, गुण्यागोविंदाने राहणाऱ्यांवर होतो, ज्यामुळे आपण एकमेकांविषयी खोट्या बातमीच्या आधारे मनात राग, द्वेष धरून वागतो ज्याचा उपयोग काही स्वार्थी लोक करतात …