सील बंद केलेली मालमत्ता थकबाकीदारां कडून परस्पर सुरूच – कोंढव्यातील एस के हॉल च्या मालका विरोधात गुन्हा दाखल.
🔴 पुणे ( खादी एक्सप्रेस ऑनलाईन ) :तब्बल ८० लाखांपेक्षा जास्त थक बाकी भरणा असल्याने सील केलेली मालमत्ता परस्पर सील तोडून बिनधास्त पणे वापरत आणली जात होती,या संदर्भात पुणे कोंढवा येथील सर्वे नं. ५१ मिठानगर, नावाजिश पार्क येथील एस के हॉल चे मालक आरिफ समद खान व त्यांची पत्नी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. थकबाकी भरणा असल्याचे पुणे मनपा कडून नोटीस बजावण्यात आले असता त्या कडे आरिफ खान यांनी दुर्लक्ष करून मनपा कडून ताळेबंद केलेली मालमत्ता परस्पर सील तोडून भाडेतत्त्वावर देऊन वापरत आणली.फंक्शन हॉल ला बांधकाम विभागाची परवानगी नसूनहीं बांधकाम, सोबतच थकबाकी म्हणून सील केलेल्या मालमत्तेची कुलूप तोडून लग्नसमारंभ, बर्थडे पार्टी साठी सर्रास पाने हॉल भाड्याने देण्यात येत आहे. या सर्व प्रकरणा बाबत मनपा कडून कोंढवा पोलीस ठाण्यात संबंधितांन वर कारवाई करिता पत्र व्यवहार करण्यात आला होता परंतु त्या कडे तब्बल ५ महिन्या पासून दुर्लक्ष केले गेले, कोंढवा पोलिसांकडून याबाबत कोणताही गुन्हा नोंदविला गेला नाही. सदरील प्रकरणाची दखल सामाजिक कार्यकर्ते वाजीद खान यांनी घेऊन या बाबत ची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे आणि कर आकारणी कर संकलन विभाग यांस कडे केल्या नंतर कोंढवा पोलीस ख्यात्यास जाग आली .पुणे मनपा तर्फे विभागीय निरीक्षक कर आकारणी कर विभागातील राजेश वाघचौरे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील फंक्शन हॉल च्या थकबाकी यादीत फक्त एस के हॉलच नाही तर पारगे नगर येथील सिटी लॉन्स चे ३७ लाख १५ हजार,ओमकार गार्डन ८ लाख ५८३ , वेल कम हॉल ३२ लाख १९ हजार २१०, फाईव्ह स्टार हॉल ९ लाख १५ हजार अशी असून त्यांच्या वर कारवाई कधी होणार..? एस के हॉल बाबत गुन्हा दाखल झाला आता पुढची कारवाई केव्हा…? असे अनेक प्रश्न लोकां कडून विचारले जात आहे. सोबतच जो पर्यंत थकबाकी वसूल होत नाही तो पर्यंत मालमत्तेवर टाळेबंदी केली जावी आशी मागणी देखील केली जात आहे. जो पर्यंत माहिती अधिकार कडून माहिती विचारली जात नाही तो पर्यंत यंत्रणेला जाग ही येत नाही, हीच का अंमलबजावणी..? .