सारथी फाऊंडेशन यांनी सुभाष नगर आरोग्य कोठी समोरील चेंबरचे घाण पाण्याकडे शासनाचे लक्ष वेधून दिले
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी :- सारथी फाऊंडेशन हे नेहमीच सामाजिक कार्य, गोरगरिबांचे कार्य, स्वच्छता याकडे लक्ष देत असते. या संस्थेनेवेळोवेळी लोकांच्या आरोग्य विषयक प्रश्नांना सोडवण्याचा प्रयत्नकेलेला आहे. नुकतेच येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रिय कार्यालयात सुहास फुलचंद कांबळे कार्याध्यक्ष यांच्या मार्फत येरवडा प्रभाग नं ६ मध्ये सुभाष नगर आरोग्य कोठी समोर रोज नागरिकांना घाणीनेतुंबलेल्या चेंबरचे पाणी जमल्यामुळे लोकांना त्रास होतो. या बाबतसदर अर्जात नमूद केलेले आहे. या चेंबरचे पाणी पाणी कधी थांबणार, चेंबर कधी साफ केले जाईल, वर्षभरापासून सारथी फाऊंडेशन हा लढा देत आहे. वेळोवेळी लोकांनी या संस्थेकडे प्रश्नमांडलेले आहेत. सारथी फाऊंडेशनचे राजेश इंद्रेकर, फिरोज अकबर शेख, गणेश घाय मुक्ते, गिरीष सोनवणे आदि लोकांनी शासनाकडे या बाबत तक्रार केली. या घाण चेंबर बाबत शासनाला प्रश्नविचारले, सारथी फाऊंडेशन यांच्याकडे सदरील भागातील स्थानिकनागरिकांनी, सुरेश लक्ष्मण टिंगरे, सौ. लता माने, अश्विनी जाधव,विजय परेरा, सारदा सलती, मेरी परेरा, नंदवी शेख, फुलभाई,भालेराव, भगवान कुँवर, प्रकाश पावले, तस्लीमा कुरेशी, फरजाना शेख, अमित काळे, जैनबी पठाण, अर्चना गवळी, जीमल शेख,अरुण वाघमारे सदरील लोकांनी पाठपुरावा केला आणि सारथी फाऊंडेशनच्या या कामाला यश येवून व सारथी फाऊंडेशनची गंभीरदखल घेवून काम चालू करण्यात आले. पुढील अंकात सारथीफाऊंडेशन बाबत सविस्तर माहिती ……