साजिद शेख यांची केंद्रीय पत्रकार संघ (CPJA) मध्ये जिल्हा महासचिव पुणे महाराष्ट्र या पदावर नियुक्ती
खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ऑनलाईन :- निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे “खादी एक्सप्रेस ” वृत्तपत्राचे संस्थापक आणि प्रशासक साजिद शेख यांची नुकतीच केंद्रीय पत्रकार संघ CPJA जिल्हा महासचिव पुणे महाराष्ट्र या पदावर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड, महाराष्ट्र राज्य सचिव राजीव दळवी यांच्या सूचने खाली आणि कार्याध्यक्ष विनायक कांगणे यांच्या अनुमोदनाने नितीन अण्णा पुंडे, अफझल खान, यांनी सदर नियुक्ती केली. साजिद शेख यांना सदर नियुक्ती आणि पुढील यशाच्या वाटचाली साठी भरघोस शुभेच्छा….!
ग्राउंड रीपोर्टिंगचा बादशहा,भ्रष्टाचार, अनधिकृत बांधकाम, अन्याय, विषय कुठलाही असो प्रत्येक विषयातला बारीक सारीक, सत्य आणि परिपूर्ण अभ्यास करत बातमीची सत्य बाजू लोकांसमोर मांडण्याला “खादी एक्सप्रेस” चे संपादक आणि प्रशासक साजिद शेख यांनी नेहमीच प्राधान्य दिले, पत्रकारितेतून एखाद्या बातमीची चांगली वाईट प्रत्येक दृष्टिकोनातून जनते पर्यंत पोहचविण्यासाठी दक्ष राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे साजिद शेख
कोण साजिद शेख..?
पत्रकारितेचा कोणताही वारसा नसताना सामान्य कुटुंबातील “खादी एक्सप्रेसचे” संपादक म्हणून ओळखले जाणारे साजिद शेख यांनी आपल्या निर्भीड, सत्य, रोखटोक, सोबतच शहरातील अनाधिकृत बांधकामाच्या विरोधातील लेखनीद्वारे कमी वयात आणि खूपच कमी काळात पुणे शहरातील घरा घरांमध्ये पोहोचले आहे. शहरातील रस्त्यावरचे खड्डे असो किव्वा पाण्याची समस्या, प्रत्येक छोट्या मोठ्या विषयाचा बारीक सारीक बाबी त्यांनी आपल्या लिखाणातून लोकांसमोर आणली