संतापजनक…! अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण…व्हिडिओ पाहा…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाइन : अतिशय चिढ आणि संताप निर्माण करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच प्रचंड व्हायरल होतोय ज्यात कदाचित एक संगणक प्रशिक्षण वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन चिमुरड्याला एक नीच प्रवृत्तीच्या युवका कडून अमानुष मारहाण केली जात आहे, आधी लाकडी पट्टी तुटे पर्यंत आणि नंतरून लाथा बुक्क्यांनी चिमुरड्याला मारहाणी केली जात आहे..अतिशय चीढ आणि राग निर्माण करणारा हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आणि कमी वेळात हा व्हायरल सुद्धा झाला…
पण असे घाणेरडे, नीच काम निर्लज्ज पने करून आपले कर्तृत्व बिनधास्त पोस्ट करण्याची हिम्मत करणारे हे लोक कोण..? आणि या लोकांवर कोणती कारवाई केली जाते …? का फक्त एक मनोरंजन म्हणून व्हिडिओ पाहून तो शेअर किव्वा स्किप करून अश्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे.. ? लहानशा जीवाला काचऱ्याची किंमत देणाऱ्या लोकांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्या वर कठोरात कठोर कारवाई होण्याची अत्यंत गरज आहे सोबतच अश्या घटनेत होणाऱ्या वाढीत पालकांची देखील चुक आहेच मुलांना शाळेत, किंवा शिकवणीत सोडले म्हणजे आपण काही काळसाठी आपल्या जबाबदारीतून सुटलो म्हणून सुटकेचा श्वास सोडून आपण आप आपल्या कामात निघून जातो खरे पण आपण जिथे आपल्या मुलाला सोडत आहात तेथील शिक्षण प्रणाली, शिक्षक, सोबतचे कर्मचारी वर्ग यांची बद्दल ही थोडी माहिती ठेवणे पालकांची जबाबदारी आहे .. कारण अश्या गंभीर घटनेकडे दुर्लक्ष करून, व्हिडिओ शेअर, लाईक आणि स्कीप च्या पलीकडे जाऊन अश्या गोष्टींची सहनिशा करून आरोपींना शिक्षा देणे अत्यंत गरजेचे झाले आहे …अन्यथा अश्या ह्रदयहिन निच लोकांच्या कृत्यात वाढच होत राहील, ज्यात बळी पडतात ते निष्पाप आणि चिमुरडे जीव…..