विश्व मानवाधिकार परिषदेच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदी महेश आगरकर यांची नियुक्ती.
खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन ) :- विश्व मानवाधिकार परिषदेच्या युवक महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष महेश आगरकर विश्व मानवाधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.आर.अन्सारी यांनी महेश आगरकर यांच्या नियुक्तीची घोषणा करून नियुक्तीचे पत्र प्रदेशचे अध्यक्ष नवेद शेख यांच्या हस्ते देण्यात आले.
महेश आगरकर यांनी विश्व मानवाधिकार परिषदेच्यावतीने नागरिकांच्या न्याय हक्कासाठी कार्य सुरू केले असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची नियुक्ति करण्यात आली व युवकांमध्ये जनसंपर्क दांडगा असल्याने युवकांना संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच युवकांच्या विविध अडीअडचणी व न्याय हक्का साठी प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमाने कठीबद्ध असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली व संघटनेच्या माध्यमातून युवकांसाठी भव्य नोकरी व रोजगार मेळावा देखील आयोजित करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.