विरोधातून वाट काढून आखेर बेकायदा बांधकामांवर ” मार हातोड्याचा “- कोंढवा खुर्द
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): कोंढवा खुर्द परिसरात अवैध बांधकामाच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ आणि त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रास, वाहतूक कोंडी, धोकादायक बांधकामे ज्या मुळे नागरिकांच्या जीवाला निर्माण झालेला धोका… या सर्व बाबी लक्षात घेऊन आखेर पुणे म.न.पा. कडून ३० जून (गुरुवार) रोजी बांधकाम विभागा कडून हातोड्याचा जोरदार मार या अनधिकृत बांधकामांवर करण्यात आला …कोंढवा खुर्द, सर्व्हे नं. ५१/५५, भाग्योदय नगर, गल्ली नं. १ येथील एक ३ मजली (२८०० चौ.फु)आणि दुसरे २ मजली(६००चौ.फु.) अश्या एकूण ३४०० चौ.फु.,अनधिकृत बांधकामावर, बांधकाम विभाग(सावरकर भवन झोन क्र.४ ), पुणे म.न.पा., स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्या सहभागाने कारवाई करण्यात आली, बांधकाम विभागाने आपले जबाबदारीची जाण ठेऊन या कोंढव्यातील अनधिकृत बांधकामाच्या दिशेने हायड्रॉलिक डिमॉलिशन कटर चालविला… “कोंढवा परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत करण्यात आलेल्या तक्रारी मध्ये झालेल्या वाढीकडे पाहता आमच्या विभाग कडून वेळोवेळी संबंधित विकसन कर्त्यांना नोटिसा बजावून देखील अवैध बांधकाम सुरूच होते, ज्यामुळे आता अश्या बांधकामांवर योग्य तो गुन्हा दाखल केला जाईल सोबतच दर आठवड्याच्या गुरुवारी या परिसरातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात येईल विशेषतः अश्या कारवाई साठीच पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभागाकरिता अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी हायड्रॉलिक डिमॉलिशन (with Trailer) हे मशीन खरेदी करण्यात आले या मशीनचे मा. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. रवींद्र बिनवडे, मा. उप श्री. आयुक्त माधव जगताप, मा. उप आयुक्त श्री. महेश डोईफोडे, मा. अधीक्षक अभियंता श्री. युवराज देशमुख तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते”अशी माहिती बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी ” खादी एक्सप्रेस” सोबत बोलताना दिली, लवकरच कोंढवा खुर्द, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी इ. अवैध बांधकाम मुक्त म्हणून समोर येईल हे या कारवाईने दिसून येत आहे…