लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार….! पोलीस असल्याचा बनाव करून अश्लिल कृत्य
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : “मी पोलीस आहे, मी जे काही सांगेन ते एकावेच लागेन, माझं कोणी काही बिगडवू शकत नाही” अशी धमकी देवून वारंवार महिलेवर बलात्कार, अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून, महिला गर्भवती राहिल्यावर जबरदस्ती गर्भपात करण्यासाठी लावणाऱ्या आकाश प्रकाश पांढरे विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने (शनिवारी दि. २६ रोजी ) गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला आपल्या मूली सोबत भोसरी परिसरात एकटी राहत असल्याचा फायदा घेत सुरवातीला आपण पोलीस असल्याचा खोटा बनाव केला, महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, ऑक्टोंबर २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधी वारंवार महीलेवर बलात्कार केले, सदरची महिला गर्भवती राहिल्यावर आकाश याने धमकावून तिला गर्भपात करायला सांगितले. या प्रकाराला दिवसेंदिवस वाढतच गेल्याने आखेर पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा कदम करीत आहे.