रात्रीस खेळ चाले….!सुसंस्कृत कामशेत परीसरात ‘वेश्या’ व्यवसायाचा नवा अड्डा…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ऑनलाईन : ( अबू पठाण, मावळ तालुका ) मुंबई-पुणे हायवे रोड, तळेगाव चाकण चौक परीसरात नव्याने बहरलेल्या वेश्या व्यवसायामुळे सुसंस्कृत आणि प्रतिष्ठी कामशेत परीसराचे नावावर अंधाराचे जाळे पसरू लागले आहे. CRPF Camp शेजारीच सायंकाळ च्या अंधारा बरोबरच रंगातयेणाऱ्या या व्यवसायात CRPF Camp परीसरातच सायंकाळी अंधार पडल्या पासून या महिला रात्री उशिरा पर्यंत तेथेच रेंगाळत असतात देहविक्री करणाऱ्या महिलांची वर्दळ वाढल्याने स्थानिक महिला वशालेय विद्यार्थिनींना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असून परिणामी दिवसां ही त्यांना घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे.

लगतच असणाऱ्या असलेल्या लॉजिंग व्यवसायामुळे व्यवसायाशी संबंधित अनोळखी महिला व पुरुष थेट येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना विचारणा करून त्रास देतात, गर्दीच्या ठिकाणी या वेश्या अश्लिल चाळे करत असल्याने महिलांना खाली मान घालून वावरावेलागत आहे. तसंच, या व्यवसायामुळे गुन्हेगारीतही मोठया प्रमाणत वाढ झाली आहे, याला वेळीच आळाघातला गेला नाही तर नवी पिढी, ऐवढेच नाही तर शाळकरी मुले देखील या दुषित वातावरणात मिसळुन चुकीच्या आणि गुन्हेगारीच्या वाटेवर जाण्यास वेळ लागणार नाही, लहान मुलांना तर यापरिसरात आणणं धोक्याचं होऊन गेलंय. विशेष म्हणजे याप्रकरणी जाब विचारणाऱ्या स्थानिक महिलांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलां कडुनच धमकी मिळते….याचे कारणही असे की लगतच असणारे लॉजमालक या महिला आणि व्यवसायाला आपल्या आर्थिक फायदयासाठी पाठींबा देत आहे, हेलालची लॉजचे मालक अवैध धंद्यांचा आश्रय घेत गुंतवलेले पैसे वसूल करण्यासाठी पैसे कमावण्याचा सोपा मार्गपत्करतात. परीणामी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या व्यवसायात शिरकाव केला असून दलाली सुरू केलीआहे. पैशाच्या कारणावरून अनेकदा मारहाणी सारख्या घटना सध्या घडत असुन याघटणांत दिवसेंदिवस वाढहोवुन पुढे याचे रूपांतर किती भयानक होईल याचा अंदाज प्रत्येक जण लावुच शकतो, वेश्या व्यवसायामुळे महिला, महाविद्यालयीन युवतींना या परिसरात ये-जा करणे कठीण झाले आहे परिणामी स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधित परीसरातील पोलिस विभागास या प्रकाराला वेळीच प्रतिबंध घालणे अत्यंतगरजेचे झाले आहे. पोलिसांना न जुमानता वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि त्याचे संबंधित साथीदारांवर पोलिसांनी कायदयाचा दणका देत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून हे धंदे बंद करण्याची मागणी येथील रहिवासी कठीण झालेल्या वर्गाकडुन केली जात आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *