‘राज’नीतिक भोंग्याचा पक्षावर परिणाम..! पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा म.न.से ला ‘टा-टा’ ‘बाय-बाय’….

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): मागील दोन वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शनिवारी (०२ एप्रिल) शिवाजी पार्क येथे संपन्न झाला खरा पण यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सामाजिक शांतता भंग करणारे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा परिणाम म.न.से पक्षावर होण्यास सुरवात झाली आहे.

राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील आपल्या भाषणात मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शवला. मशिदी वरचे भोंगे हटवले नाही त्याच मशिदीसमोर स्पीकर्स लावून ‘हनुमान चालिसा’ लावा, असे आदेश राज ठाकरे यांनी म.न.से सैनिकांना दिले, आदेश मिळताच घाटकोपर सह अनेक म.न.से कार्यालयावर या आदेशाचे पालन देखील केले गेले.

पण राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे मनसेचे राज्यभरातील मुस्लीम पदाधिकारी दुखावले गेले परिणामी काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी मनसेला ‘ टा-टा बाय-बाय ‘ केले आहे. पुणे महापालिकेत म.न.से पक्षाचे ‘ दोनच ‘ नगरसेवक आहेत ज्यांच्या विभागात मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचा वाटा आहे, आणि त्यातच राज ठाकरे यांच्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे शहरातील शाखा अध्यक्ष माजिद शेख यांच्यासह अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

माजीद शेख

माजिद शेख यांनी विभाग अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला,त्या पाठोपाठ म.न.से शहर वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

शेहबाझ पंजाबी

आणखीन ही काही म.न.से पदाधिकारी देखील राजीनामा देण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात मनसेला पक्षाची भविष्याचे एक चित्र स्पष्ट दिसत आहे त्यातच दुसरी कडे मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर नाराज, राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर नाराज झाल्याची चर्चा सुरू असतानाच टी.व्ही वाहिनीवर त्यांनी या बाबत स्पष्टीकरण दिले की, ” राज ठाकरेंनी आम्हाला उभं केलंय. मी नाराज नाही, नाराज असण्याचा प्रश्नच नाही ” ज्या मुळे काल पर्यंतच्या त्यांच्या नाराज असण्याच्या प्रश्नावर त्यांनी पूर्णविराम दिला, खरे पाहता मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे आणि मनसे नगरसेवक साईनाथ बाबर या दोघांच्या प्रभागात मुस्लिम मतदारांचा मोठा हस्तक्षेप असून साईनाथ बाबर यांच्या या प्रतिक्रिये मुळे कोंढवा खुर्द येथील नागरिकां कडून नाराजगी व्यक्त केली जात आहे.

नगरसेवक साईनाथ बाबर

परिणामी पुणे मनपाचे नगरसेवक ॲड.हाजी गफुर पठाण यांनी राज ठाकरे यांच्या मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेल्या वक्तव्या निषेधार्थ ८ एप्रिल रोजी कोणार्क इंद्रायु मॉल समोर, कोंढवा खुर्द येथे निषेध आंदोलनाचा करण्याचा इशारा दिला आहे.

माजीद शेख, (पुणे, मनसे शाखा अध्यक्ष) –
‘राजसाहेबांनी जी ब्ल्यू प्रिंट आणली होती अन् ते म्हणाले होते मी शेतकरी जीन्स आणि टी-शर्ट मध्ये आणणार. त्यामुळे राजसाहेब माझे आदर्श होते अन् म्हणूनच मी पक्षात प्रवेश केला होता. पण आता राजसाहेबांनी राजकीय भूमिका बदलली आहे. म्हणून मी राजीनामा दिला आहे’, असे माजिद शेख यांनी स्पष्ट केले होते

नगरसेवक वसंत मोरे

पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे –
वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर ” मनसे पक्षकार म्हणून साहेबांसोबत मी ठाम उभा आहे, पण एक लोकप्रतिनिधी म्हणून विचार करता माझ्या प्रभागात मोठ्या संख्येत मुस्लिम नागरिकांचा समावेश आहे आणि मतदार म्हणून त्यांचा मोठा वाटा देखील आहे, प्रत्येक समाजातील लोक माझ्या कडे आपले प्रश्न घेऊन येतात, त्यात कब्रस्तान किव्वा इतर काही प्रश्न असेल तर मुस्लिम लोक माझ्याकडे हक्काने येतात आणि म्हणून माझ्या भागात मला कुठल्याही प्रकारचा वाद नकोय, माझ्या प्रभागामध्ये शांततेला प्राधान्य देत भोंगे लावणार नाही, मुळात राज ठाकरे यांचे भाषण कार्यकर्त्यांना कळालेच नाही” अश्या शब्दात आपला विरोध दर्शविला.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा पार्श्वूमीवर काल रोजी (०५ एप्रिल) मंगळवारी संध्याकाळी पुणे शहर कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत मनसेतील नाराज मुस्लीम पदाधिकाऱ्यांची कदाचित मनधरणी करण्याचा प्रयत्न देखील करण्यात येईल, या बैठकीतून नेमके कोणती नवी बातमी बाहेर पडेल या वरही सर्वांचे लक्षकेंद्रित आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल