येरवडा – व्हॉट्सॲप देहविक्री ….२ महिलांची सुटका करत एजंट ब्लॉक…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): परराज्यातील मुली / महिला यांना काही इसम वॉट्सअॅप द्वारे संपर्क करुन जास्तीच्या पैशांचे अमिष दाखवुन वेश्याव्यवसायासाठी पुणे शहरात बोलावुन घेवुन त्यांना वेश्याव्यवसाकरीता पुरवित असलेबाबत पुणे पोलिसांना गोपनिय माहीती मिळताच, पुणे पोलिसांनी सापळा रचून चंदननगर भाजीमार्केट येथे एजंट (आरोपी) ला ताब्यात ताब्यात घेवुन सदर आरोपी विरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं ६९४ /२०२३ भादवि कलम ३७०,३४ सह अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक अधिनियम कायदा कलम ४५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुणे पोलिसांना मिळालेल्या माहितीतून ऑनलाईन एजंटला बिळातून काढण्यासाठी पोलिसांनी सापळा रचत दि. ११ ऑक्टोंबर (बुधवार) रोजी सापळा रचुन बनावट ग्राहकाकरवी वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली, ज्यानंतर एजंटने विमाननगर चौकातील हॉटेल येथे दोन रुम बुक करण्यास सांगितले, व सदर ठिकाणी दोन मुली हॉटेल मधील बनावट ग्राहक थांबलेल्या रूम मध्ये आल्यानंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन मुलीना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता एजंट चंदननगर परीसरात असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती प्राप्त करून हनुमान व्यायाम शाळेशेजारी चंदननगर भाजीमार्केट येथून आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास येरवडा पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.