खादी एक्सप्रेस (ऑनलाईन) : ‘राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक निर्णयाच्या आतुरतेत असलेल्या इच्छुक नगरसेवकांना अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा नंतर राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची (Local Bodies Election) अधिसूचना पुढील चार आठवड्यात निघाली पाहिजे. यानंतर चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया संपन्न झाली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्यानंतर अखेर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रक्रिया सुरू केली असून, ११ जूनपासून प्रारूप व ४ सप्टेंबरपर्यंत अंतिम रचना जाहीर होणार असल्याने दिवाळीत निवडणुकीचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर १२ जून २०२५ रोजी देताच प्रभाग रचना तयार करण्यासाठीचे वेळापत्रक तयार झाले, त्यानुसार ११ जूनपासून प्रारूप प्रभाग रचना तयार होणार असून सर्व प्रक्रिया पूर्ण होताच ४ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिल्यानंतर हा आराखडा जाहीर करून त्यावर हरकती सूचना मागविल्या जातील ज्यासाठीच्या १० दिवसांच्या कालावधी नंतर पुढील ११ दिवसात सुनावणी घेऊन प्रभाग रचना करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे हा आराखडा पाठविला जाईल. त्यानंतर योग्य त्या बदलास निवडणूक आयोगाकडून मान्यता दिल्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली जाणार आहेजाहीर वेळापत्रका नुसार प्रगणक गटांची मांडणी ११ ते १६ जूनजनगणनेची माहिती तपासणे १७ ते १८ जूनस्थळ पाहणी १९ ते २३ जूनगुगल मॅपवर नकाशे तयार करणे २४ ते ३० जूननकाशावर निश्चित केलेल्या हद्दी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणे १ ते ३ जुलैप्रभाग समितीच्या मसुद्यावर सदस्यांनी स्वाक्षऱ्या करणे ४ ते ७ जुलैप्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे ८ ते १० जुलैप्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती सूचना मागविणे २२ जुलै ३१ जुलैहरकती सूचनांवर सुनावणी घेणे १ ते ११ ऑगस्टप्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे व हरकती सूचना मागविणे २२ जुलै ३१ जुलैहरकती सूचनांवर सुनावणी घेणे १ ते ११ ऑगस्टप्रभाग रचनेतील बदलांसह अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी आयोगाकडे पाठविणे १२ ते १८ ऑगस्टनिवडणूक आयोगाने मान्य केलेली प्रभाग रचना जाहीर करणे २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आयोगाच्या आदेशानुसार, अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, महिला या आरक्षणाच्या सोडती काढल्या जातील. त्यानंतर कोणता प्रभाग खुल्या गटासह ओबीसी, एसटी, एसीच्या पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी आहे हे निश्चित होईल. ही प्रक्रिया होण्यासाठी ऑक्टोबर मध्ये होईल, नंतर ४५ दिवसांच्या आचारसंहिता सुरू होईल , , ऑक्टोबरच्या अखेरीस दिवाळी असणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी दिवाळीपूर्वी मतदान होणार की नंतर हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे वाली वारस ( नगरसेवक) नसल्याने शहरांमधील खड्डे, जीवघेनी वाहतुक व्यवस्था, अनियमित पाणीपुरवठा, वीज, ओसंडून वाहणाऱ्या कचरा पेट्यांतून वाट काढत सर्वसामान्य जनता जगत राहत आली, नगरसेवक नसल्याने प्रश्न कोणाकडे मांडायचे, हाच मोठा प्रश्न नागरिकांसमोर पाच वर्षांत वारंवार उभा राहिला.नगरसेवक हाच खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधित्व करतो, प्रशासकीय अधिकारी दारातही उभे करत नाहीत, हा धडा पाच वर्षांत महाराष्ट्राच्या महापालिकांच्या कारभारातून नागरिकांनी शिकला. हे महाराष्ट्राच्या वैभवशाली प्रशासकीय परंपरेचे एक प्रकारे समोर आलेले अपयश आहे. पाच वर्षांपूर्वीपेक्षा आजचा नागरिक जगाशी अधिक जोडलेला आहे. त्याच्या बरोबरीने किंवा पुढे उभा राहून नेतृत्व करायचे असल्याने नगरसेवक होऊ इच्छिणाऱ्यांनाही तितकेच अत्याधुनिक व्हावे लागेल. जगाशी जोडून घ्यावे लागेल. लोकप्रतिनिधी लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ घटक आहे, हे नागरिकांना दाखवून देण्याची ही संधी आव्हान म्हणून स्वीकारणाऱ्या भावी नगरसेवकांची महाराष्ट्र वाट पाहात आहे. प्रशासकराज ला कंटाळलेला महाराष्ट्र त्यांच्या स्वागतासाठी जरूर उत्सुक आहेपण जेव्हाही निवडणूक येतील तेव्हा नागरिकां समोर काही तात्पुरते निवडणुकी पर्यंत दिसणारे चेहरे समोर येतात ज्यांच्या कार्याबद्दल, सामाजिक विचारा बाबत नागरिकांना कोणतीही कल्पना नसते, ज्या मुळे नक्की कोणाला नगरसेवक सारखी महत्वपूर्ण आणि सक्षम प्रतिनिधित्व करणारे पद द्यावे हा विचार उभा राहतो हीच अडचण लक्षात घेऊन नागरिकांना निवडलेल्या नागसेवकावर पश्चात्ताप निर्माण होऊ नये म्हणून खादी एक्सप्रेस ‘ लोकसेवक ‘ हे समाज माध्यम घेऊन येत आहे कारण :या पाच वर्षात ‘खादी एक्सप्रेस ‘ असे अनेक समाजसेवक ज्यांच्या कार्यातून लोकांच्या अडचणी तक्रारी दूर झाल्या आणि नागरिकांच्या अधिक कामी येऊन समाजात चांगला विकास घडवून आणण्याची धडपड दिसून आली आणि म्हणूनच समाज विकासासाठी ‘ नगरसेवक ‘ पद मिळवण्याच्या शर्यतीत असलेल्या लोकांचे सामाजिक कार्य, भावी उद्देश, नियोजन, विचार जनतेपुढे आणण्यासाठी ‘ खादी एक्सप्रेस ‘ आपल्या ‘ लोकसेवक ‘ या कार्यक्रमातून नागरिकांसमोर घेऊन येणार आहे, ज्या मध्ये इच्छुक नगर सेवक उमेदवार आपले कार्य, विचार आणि सामाजिक आणि आपल्या प्रभागात विकास घडविण्याच्या योजना जनतेसमोर सोप्यारीतीनी ठेवेल ज्या मुळे नागरिकांना देखील आपला ‘ भावी नगरसेवक ‘ निवडण्यास अडचण येणार नाही आणि आपला समाज , प्रभाग एका जबाबदार हातात देण्यास मदत होईल,…. इच्छुक उमेदवार ’ लोकसेवक ‘ या कार्यक्रम समाज माध्यमातून जनते पर्यंत आपले विचार मांडू शकतील , जनते पर्यंत आपले कार्य, विकास विचार पोहचवण्यासाठी ‘ खादी एक्सप्रेस ‘ ला संपर्क करा..
या नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात ‘ लोकसेवक ‘ देणार साथ…..! सर्वोच न्यायालयाच्या निर्णयाने अखेर दिवाळीत निवडणुकीस शुभारंभ…
