खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) युनिट ६ ने धडाकेबाज कारवाई करत एका सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या आरोपीच्या अटकेमुळे पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशनमधील ०५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून चोरीची कार आणि सोन्याचे दागिने असा एकूण ₹२१ लाख ४० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
असा झाला पर्दाफाश
दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ चे अधिकारी व अंमलदार वाघोली परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार नितीन मुंडे आणि कानिफनाथ कारखेल यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोखीदाणी जवळ, खराडी रोड येथे सापळा रचून आरोपी बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी, वानवडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली मारुती सुझुकी डिझायर कार (Maruti Suzuki Dzire) मिळून आली.
मोकातील आरोपी आणि मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी
आरोपी बिरजू दुधानी हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, तो ‘मोका’ (MCOCA) गुन्ह्यात जामिनावर बाहेर होता. त्याच्यावर यापूर्वीच मुंढवा, येरवडा, चिंचवड, भोसरी एमआयडीसी आणि संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.
जप्त मुद्देमाल:
- चोरीची मारुती सुझुकी डिझायर कार
- घरफोडीतील वेगवेगळ्या वर्णनाचे सोन्याचे दागिने
- एकूण किंमत: ₹२१,४०,०००/-
या अटकेमुळे पोलिसांनी पुणे शहरातील एकूण ५ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे.
यशस्वी कारवाई करणारे पथक
ही उत्कृष्ट कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. निखिल पिंगळे आणि मा. स.हा. पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हे शाखा युनिट ६ चे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखालील पथकामध्ये स.हा.पो.नि. राकेश कदम आणि मदन कांबळे, तसेच अंमलदार नितीन मुंडे, कानिफनाथ कारखेल, बाळासाहेब सकटे, सारंग दडे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीश नाणेकर, सुभाष तांबेकर, सचिन पवार, निनाद लांडे, नेहा तापकीर, ऋषिकेश ताकवणे, नितीन धाडगे, ऋषिकेश वागव्हरे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांचा समावेश होता.






