‘मिनिटाचे तास करण्याचे जादु फक्त एम.जी. रोड वरच…!- अजहर शमशुद्दिन इनामदार पुणे
खादी एक्सप्रेस ( ऑनलाईन प्रतिनिधी ): पुणे हे नाव आले की क्षणात डोळयासमोर येणाऱ्या परिसरातील एक ठिकाण म्हणजे एम.जी. रोड, खवय्येंचा स्पाॅट, शॉपिंग, मनोरंजनाचे ठिकाण असो की, नववर्षाचे स्वागत ते ख्रिसमसचे सेलिब्रेशन किंवा मॅच जिंकण्याचा आनंद नागरीक उत्साहाने एकत्रित येण्याचे ठिकाणाने जणु नवी जादुच आचरणात आणल्याचे निदर्षनात येत आहे, कारण एम.जी रोडवरील नकळत मिनिटांचा प्रवास कधी तासात बदलतो हि जादुच म्हणावी लागत आहे, खवयांची रूची पाहता रोज नवीन डिष घेवुन लागणाऱ्या हातगाडया, स्टाॅल, वाहतुकीच्या रस्त्यातील अर्ध्याहून अधिक भागामध्ये राज्य करणारे कपडे, बॅंग्स, चप्पल, तसेच फळ, भाजी विकणारे किरकोळ विक्रेते, सवारीच्या प्रतिक्षेत थांबलेले रिक्षा चालक आणि खरेदीसाठी येणाऱ्या लोकांनी पार्क केलेल्या गाडया यांच्यातुन मार्ग शोधत शोधत पुढे जाण्यात मिनिट लागनाऱ्या रस्त्यावर कधी तास निघुन जातो ते कळत नाही, सकाळी ते संध्याकाळ वर्दळ असणाऱ्या या रस्त्यावरून ॲम्ब्युलन्स, नोकरीसाठी गाडी, टु व्हिलर वरील वाहक असो की, शाळा, काॅलेजसाठी निघणारे पायी निघालेले विद्यार्थी पुढे जाण्यासाठी थोडा रस्ता मिळतो का याच आतुरतेने नजर फिरवत वाट काढतानाचे दृश्य समोर येत आहे. जास्तीत जास्त रहिदारी असणाऱ्या या रस्त्याच्या वाहतुक कोंडीमुळे वारंवार वाजणारे मोठे मोठे हाॅर्न, प्रदुषण, रस्त्यावरील कोंडी यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरीकांना मोठया प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागल्यांने त्यांच्यात नाराजी दिसुन येत आहे.
सदर गोष्टीची दखल घेत एन.सी.पी. चे माजी नगरसेवक यांचे चिरंजीव अजहर इनामदार यांनी ‘‘ वाहतुक कोंडी निदर्षनास आणुन देत याबाबत वारंवार तक्रारी देवुन या गोष्टीचा काहीएक परीणाम पुणे कॅन्टोंमेट वर होत नसल्याचे दिसुन येत आहे रिक्षा चालक, पार्क गाडया, पथफेरी वाले, तात्पुरते स्टाॅल, हाथगाडया यांमुळे दिवसे दिवस अरूंद होत जाणाऱ्या एम.जी रोड वरील नागरीकांचा त्रास, ध्वनी-वायु प्रदुषण आणि अपघाताचे दृश्य पाहता वाहतुक विभाग आणि पुणे कॅन्टोंमेंट यांनी सदर गोष्टीबाबत आमच्या तक्रारीची गंभीर दखल घेवुन वाहतुक कोंडीवर परिणामकारक उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे’ या शब्दात पुणे एम.जी. रोड वरील वाहतुक कोंडी मुक्त करण्यासाठी उपायायोजनेची मागणी केली आहे. याच वाहतुक कोंडीमुळे एम.जी. रोड परीसरातुन वारंवार अपघाताची बातमी समोर येत आहे नुकत्याच काही महिन्यापुर्वी एका आलिषान चारचाकी गाडीने सात ते आठ गाडयांना धडक दिली, या अशा घटनांमुळे रस्त्यावरून पायी जाणाऱ्या लोकांना आपला जिव मुठीत धरून जाण्याची वेळ येत आहे. वेळीच या गोष्टीची दखल घेतली गेली नाहीतर पुढे अपघाताच्या प्रमाणात होनाऱ्या वाढीची गंभीरता नाकारण्या जोगे नाही.