मांजरेकर दिग्दर्शित ” नाय वरणभात…” वादात ! अश्लील दृश्य दाखविल्या प्रकरणात गुन्हा दाखल..

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन): महेश मांजरेकर दिग्दर्शित ही ओळखच चित्रपट प्रेमींना पुरेशी असणारे प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक, लेखक, अभिनेते महेश मांजरेकर दिग्दर्शित नुकताच १४ जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ” नाय वरणभात लोंचा, कोण नाय कोंचा” वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात अल्पवयीन मुलांसोबतचे अश्लिल दृष्य दाखवण्यात आल्याने महेश मांजरेकर यांच्या विरोधात आय.पी.सी कलम २९२,३४ पोक्सी कलम १४ तसेच आय.टी. कलम ६७, ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने पुढील चौकशीचे आदेश दिले आहे. त्या शिवाय चित्रपट निर्मात्यांना विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिकाही दखल करण्यात आली असून, अनुक्रमे दाखल तक्रारीत एक तक्रार मुंबई वांद्रे दंडाधिकारी न्यायालय तर दुसरी मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.चित्रपटाचा नेमका मुद्दा : मांजरेकर यांनी एका दृष्टीने चित्रपटातून एक सत्य परिस्थीती मांडण्याचा प्रयत्न केला ज्यात माणूस वाईट नसतो, परिस्थिती चांगली-वाईट असते. त्याच्या हातून घडणारी कृती ही; सभोवतालच्या परिस्थितीवर, घटनांवर, पूर्वी घडलेल्या गोष्टींवर आधारित असते. ही ‘कृती’ त्या घडलेल्या घटनांच्या प्रतिक्रियांची ‘साखळी’ कधी बनून जाते; हे खुद्द त्यालाही कळत नाही. असा माणूस स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. परिस्थितीनं ग्रासलेला माणूस प्रसंगी सैतानाचं रूपही धारण करु शकतो. अशीच मनाला सैरभैर करणारी वास्तवस्पर्शी गोष्ट त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. पण काही दृष्यां मूळे पुढे काय….? आणि न्यायालयाचा निर्णय काय येतो ….? हे प्रश्न चित्रपट प्रेमी आणि महेश मांजरेकर यांच्या चाहत्या पुढे उभा राहिला आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल