महापालिकेवर आज पासून प्रशासकीय राजवट लागू …नगरसेवकांच्या कामकाजावर पूर्णविराम…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन): सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे निवडणुकांकडे सर्व नगरसेवकांचे लक्ष लागले होते त्यातच महापालिकेला पंचवार्षिक मुदत १४ मार्च पासून संपल्यामुळे सर्व नगरसेवक,पदाधिकारी, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीचे अध्यक्ष,गटनेते, तसेच १६४ नगरसेवक, ५ स्वीकृत नगरसेवक यांच्या कार्यकाळाला आज पासून पुर्ण विराम लागला आहे. कार्यकाळ संपुष्टात आल्याने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचे सुख सुविधा, शासकीय वाहन काढून घेऊन त्यांच्या कार्यालया टाळे लावण्यात आले आहे, उच्च न्यायालया कडून जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत निवडणुका लांबणीवर गेले असून, त्यातच महानगर पालिकेतील सर्व नगरसेवक आणि नगरसेविकांचा कार्यकाळ १४ मार्च रात्री १२:०० वाजता संपुष्टात आल्यामुळे आता महानगर पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू होणार आहे. आजपासून पुणे महापालिकेचा प्रशासक म्हणून आयुक्त विक्रमकुमार कारभार पाहणार आहे सोबतच सर्व आर्थिक आणि अधिकाऱ्यांची सूत्रे आयुक्त कुमार यांच्या हाती असणार तसेच राज्यशासनाद्वारे सर्व पक्षीय सभासदांची एक मार्गदर्शक समितीची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच राज्य समिती कायम राहणार का ? यावर अजून प्रश्न चिन्ह कायम आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल