मंडवे खुनाच्या आरोपीस अवघ्या ४ तासात केले जेरबंद…पुणे पोलिसांची उल्लेखनीय कारवाई…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पर्वती पुणे येथील MSEB मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणुन कार्यरत असलेले गोपाळ कैलास मंडवे (वय ३२ वर्षे, रा. ओवी आंगण कॉलनी, जाधव नगर, रायकर मळा, पुणे ) यांचा काल दि. ०४/०९/२०२३ रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे हद्दीत मनोहर गार्डन जवळ, खंडोबा मंदीर रोड, रायकर मळा, पुणे येथे भरदिवसा धारदार हत्याराने अज्ञात इसमाने हत्या करून पसार झालेच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिसांनी तात्काळ दाखल घेत आपली पथके आरोपीच्या शोधत रवाना केली, त्याप्रमाणे गोपनीय बातमी मिळताच अवघ्या ४ तासात आरोपी नामे सिधांत दिलीप मांडवकर, वय- १९ वर्षे, रा. सध्या धायरेश्वर मंदीराजवळ, पोकळे वस्ती, अजिंक्य तारा मित्र मंडळ, स.नं. ५५ / ६, धायरी, पुणे यांस अटक करून जेरबंद केले. सदर आरोपी सिद्धांत मांडवकर हा एस.एन.डी.टी. कॉलेज समोर, कर्वे रोड, पुणे येथे थांबला असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथक रवाना करुन सदर आरोपीस ताब्यात घेवुन त्यास चौकशी करता त्याने सदर खुनाची कबुली दिली असता आरोपी विरुद्ध सिंहगड पोलीस स्टेशन गु.र.नं ४२१ / २०२३ भादवी कलम ३०२ महा.पो.अधि. ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल असुन हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पुणे शहरचे मा. पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री अमोल झेंडे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. सुनिल तांबे यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, पोलीस अंगलदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गॅगी जाधव व गणेश ढगे, शिवाजी सातपुते व नारायण बनकर दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे…

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल