भारतातर्फे पॅलेस्टाईनसाठी कोंढवा मधून असंखेतून सुरवात….गोळीबार मैदानात…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या मध्ये 7 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या युद्धाचा आजही संघर्ष कायम आहे. या युद्धात आतापर्यंत ४००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धाचा परिनामतः एकमेकांवर बॉम्ब, रॉकेटचा वर्षावात पॅलेस्टाईन मधील अखेच्या अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत, आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या शवा जवळ बसून रडणारी लोक, लहान मुले, शवांच्या गर्दीत आपल्या व्यक्तीला शोधणारी लोक, युद्धामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या निर्यात बंद केल्याने भुकेने व्याकूळ फिरणारे नागरिक लहान मुले ही परिस्थिती अक्षरशः मनाला हेलावून टाकणारी आहे, पण, कितीही जुलूमजबरी, अत्याचार झाला तरीही भक्कम पर्वताप्रमाणे धर्म, देश, अक्सा मस्जिदसाठी संघर्ष करणाऱ्या निरपराध, निर्दोष लोकांसाठी आज २२ ऑक्टोंबर (रविवार) रोजी इदगाह मैदान, गोळीबार मैदान समोर, शंकर शेठ रोड, कॅम्प, पुणे येथे सायंकाळी (मगरीब) असंख्य मुस्लिम बांधव आणि महिलांनी एकत्र येवून नमाज पठण आणि प्रार्थना ( इजतेमाई दुआ) केली. पॅलेस्टाईन मध्ये लवकरात लवकर पूर्ववत शांतता, सुख समृद्धीसाठी भारता तर्फे कोंढवा मधून पार पडलेल्या नमाज पठण आणि प्रार्थनेचे दृष्य अविश्वसनीय होते…


व्हिडिओ पहा :-