ब्लॅकमेल करून पिंपरीतील शिक्षिकेवर बलात्कार – कर्जासाठी पैसे देतो , मी एसीपी आहे असे आरोपी कडून बनाव करून कुकर्म .

पुणे ( खादी एक्सप्रेस ऑनलाइन) : पिंपरी चिंचवड , सांगावी परिसरा मध्ये एका ३८ वर्षीय शिक्षिकेस ब्लॅकमेल करून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सांगावी पोलीस ठाण्यात विकास अवस्थी ( रा. पिंपळ गुरव पिंपरी चिंचवड ) या आरोपी विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. कर्जा साठी १० टक्कयाने पैसे देतो असा बनाव करून आरोपीने पीडित महिलेला घरी बोलाविले तिच्या कडून २ ब्लँक चेक वार सह्या ही घेतल्या , पीडितेला सॉफ्ट ड्रिंक च्या साहाय्याने गुंगी चे औषध दिले. आरोपीने पीडित महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून घेतले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.” झालेल्या घटने बद्दल कोणालाही सांगितले तर तुझे विवस्त्र फोटो शाळेत आणि तुझ्या घरातल्या लोकांना दाखवीन . मी रिटायर्ड एसीपी आहे माझे कोणी काहीही बिघडवू शकत नाही , कोणालाही सांगण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या घरच्यांना जिवे मारून टाकून ” अश्या धमक्या वारंवार देऊन आरोपी विकास याने पीडित महिले वर बलात्कार केले . वारंवार पीडित महिला कार्यरत आसलेल्या शाळेत जाऊन आरोपी पीडितेला तिचे विवस्त्र फोटो दाखवून गाडी वर स्वतःच्या घरी घेऊन येत आणि तिच्या वर लैंगिक अत्याचार करीत होता. आखेर सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेला तक्रार नोंदवली . हा सर्व प्रकार डिसेंबर २०१९ ते ८ ऑगस्ट या कालावधीत घडला . तपासात निष्पन्न झाले की आरोपी विकास अवस्थी ह्याने ए सी पी असल्याचा फक्त बनाव केला होता. आरोपी सध्या फरार आसून त्याचा शोध सुरू आहे. या घटने चा पूर्ण तपास पोलिस महिला उपनिरीक्षक कविता रूपनर यांच्या हाती आहे .

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल