खादी एक्स्प्रेस ( ऑनलाईन ) पुणे : पुणे शहर परिसरात अल्पवयीन मुलांमध्ये टोळीयुद्ध आणि जुन्या वादातून जीवघेणे हल्ले होण्याच्या घटना गंभीर स्वरूप धारण करत आहेत. पुणे पोलिसांच्या खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला धारदार शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी केले. दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०३:१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कृष्णकुंज बिल्डिंग समोर, महाराणा प्रताप गार्डन जवळ, १३२७ शुक्रवार पेठ, पुणे या सार्वजनिक रस्त्यावर हा हल्ला झाला.
फिर्यादी (वय १६ वर्षे, रा. स.नं. १३३ इंडियन ऑइल पेट्रोल पंपजवळ, दांडेकर पूल, पुणे) आणि त्यांचा मित्र मोटारसायकलवरून जात असताना, आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांची गाडी अडवली. आरोपींनी फिर्यादीच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्यांच्या गाडीला मागून धडक दिली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीचा मित्र, मयंक सोमदत्त खरारे (वय १७ वर्षे, रा. आंबिलवाडा कॉलनी, साने नगर, बिल्डिंग नं. २, पुणे) याला गाठले. आरोपींनी धारदार हत्याराने मगन खरारे याच्यावर हल्ला करून खून केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी खडक पोलीस स्टेशनमध्ये तीन अल्पवयीन आरोपींविरुद्ध गु.र.नं. ५४९/२०२५, भा.न्या.सं.क. १०३(१) (जखमी करणे), १०९(१) (गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे), ११८(१)(२) (सार्वजनिक शांततेचा भंग), ३(५) (गुन्हेगारी कट), आर्म्स ॲक्ट कलम ४(२५) (बेकायदेशीर शस्त्र बाळगणे), महाराष्ट्र पोलीस अधिनियम (म.पो.अ.) कलम ३७(१) सह १३५ (शस्त्र बाळगण्यास मनाई व आदेशाचे उल्लंघन) गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप व्हटकरआणि त्यांच्या पथकाने तत्परता दाखवत तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खडक पोलीस स्टेशन विशेष उपाययोजना करत आहे.






