बेकायदा हत्यार बाळगल्या प्रकरणी अटक। पुण्यामध्ये खंडणी विरोधी पथक – २ ची धडक कारवाई

खादी एक्स्प्रेस प्रतिनिधी:- बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी पुणे खंडणी विरोधी पथक २ ने अटक केली आहे.त्याच्याकडून 1 पिस्तुल आणि 1 काडतुस असा एकुण 40 हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. वानवडी परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.मलेश सारंग वेलायधन (25, रा. घोरपडी वस्ती,श्रीवस्तीनगर, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथक – 2 मधील पोलिस कर्मचारी शैलेश सुर्वे आणि सचिन अहिवळे यांना आरोपी हा वानवडी रोडवरील एका चहा सेंटरच्या समोर फिरत असून त्याच्या कमरेला पिस्तुल असल्याची माहिती मिळाली होती.पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण,अंमलदार संपत अवचरे,सुरेंद्र जगदाळे. साळुके, उत्तरकर, सचिन अहिवळे,अमोल पिलाने, प्रविण पडवळ,विजय गुरव, आणि चेतन शिरोळकर यांच्या पथकाने सापळा रचुन आरोपी मलेश वैलायधन याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 1 पिस्तुल आणि 1 काडतुस असा एकुण 40 हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. . पोलिसांनी त्याच्याविरूध्द वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल