बारावी २०२२ परीक्षा वेळापत्रकात तारखांचा बदल…!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाइन) : कोविड १९ मूळे शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आले, आणि वेळोवेळी परीक्षेचे स्वरूपातही बदल करण्यात आले शाळा ऑनलाइन ऑफलाईनच्या बदला नंतर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार का, अश्या प्रश्न होत असतानाच या परीक्षा ऑफलाइनच होणार असल्याचे परिक्षा मंडळाने जाहीर केले, त्यानंतर मंडळाने गुरुवारी तसे परिपत्रकही जारी केले तसेच आधीच्या जाहीर बारावी २०२२च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. वेळापत्रकात तांत्रिक अडचणी मूळे करण्यात आलेल्या बदलाची पूर्ण माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीच्या मार्च-एप्रिल २०२२ च्या सर्वसाधारण (General), द्विलक्षी (Biofocal)आणि व्यावसायिक (M.C.V.C.) वेळापत्रकातील दिनांक ०५/०३/२०२२ आणि ०७/०३/ २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विषयांच्या परीक्षा काही तांत्रिक कारणास्तव एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा अनुक्रमे ०५/०४/२०२२ आणि ०७/०४/२०२२ या दिवशी होतील. परीक्षांच्या सत्रात बदल नसून,बोर्डाने असेही कळवले आहे की बारावीच्या लेखी परीक्षा आणि अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात ही कोणताच बदल करण्यात आलेला नाही, सोबतच १०वी परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील वरील बदलाची सर्व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंद घेऊन, विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल