फेरीवाले विक्रेत्यांवर ‘भाई’गिरी पडले महागात शिल्लेगाव पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा…
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी ( ऑनलाईन): लॉकडाऊनच्या अनलॉक सोबत जो तो आप आपल्या रोजगार आणि पोटापाण्या साठी कसरत करत आहे पण यातच केवळ सोशल मीडिया वर काही लाइक्स मिळून प्रसिध्द होण्यासाठी किंवा हे ही म्हणू शकतो आपली भाईगिरीचा जोर दाखवण्यासाठी ‘भाई ‘ म्हणवून घेणारे हे लोक आता किरकोळ विक्रेते, फेरीवाल्यांना आपला शिकार बनवत आहे.
अश्याच एका ‘भाई ‘ ला शिल्लेगाव पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. आपेगाव (ता. गंगापूर ) येथे दररोज किरकोळ विक्रेते, फेरीवाले, भाजीविक्रेते, किरकोळ व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात यातच याच गावात राहणारा योगेश प्रकाश जाधव (वय ३४) नावाचा युवक अश्या फेरीवाल्यांवर आपली दादागिरी दाखवत, या गावामध्ये यायचे नाही…पुन्हा येथे दिसायचे नाही शिवीगाळ करून, अर्वाच्य भाषेत व जातीवादक शब्दात बोलत आणि या सर्व प्रकारचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकत,ज्या मुळे समाजात तणाव निर्माण होवू शकतो. अखेर या फेरीवाल्यांनी या सर्व प्रकारची तक्रार शिल्लेगाव पोलिस ठाण्यात दाखल केली त्यानंतर शिल्लेगाव पोलिसांनी तत्काळ कारवाई करत योगेश उर्फ हरी ओम याला अटक केली आहे. या घटनेमुळे लाइक्स प्रेमींना काहीशी का होईना चांगलीच अद्दल घडली हे खरे..