फिरोज शेख यांचे असे व्यक्तिमत्व आले समोर…की लोक म्हणाले… .!

खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : पुणे शहरात सध्या चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे फिरोज शेख यांचे खरे व्यक्तिमत्व हो…कर्ता करवता जेव्हा ठरवतो प्रत्येक मनुष्यात लपलेले आपले अस्तित्व दाखतो याची सत्यता दिसुन आली ती फिरोज शेख यांच्या अंतरात लपलेल्या खऱ्या व्यक्तिमत्वाने जेव्हा आपल्या वर्तनातुन दाखवुन दिले की, माणसाने खावे जगण्यासाठी, पण जगावे समाजासाठी, अखिल भारतीय सेना या राजकीय पक्षात वर्षानुवर्ष कार्यरत असणारा, पक्षासाठी काम करणारा एक सामान्य व्यक्तिमत्व ज्याच्या पुर्व आयुष्यात अनेक वेडे वाकडे वळण आले ज्यात समाजाने नव नवीन नावाने कधी फिरोज शेख यांना हाक मारली.. पण काही संकटे अशी येतात की, माणसातील लपलेली एक खरी व्यक्ति जन्म घेते, फिरोज शेख यांच्या जिवनातील हा काळ म्हणजे कोरोना काळ…महामारीच्या काळात जेव्हा गरीब, गरजु लोकांच्या खऱ्या परीस्थितीची जाण, गरीबांच्या पोटाची भुक म्हणजे काय…. सामान्य नागरीकांची परिस्थितीशी आयुष्याची असलेली झुंजींची जाणीव जेव्हा फिरोज शेख यांना झाली…..तेव्हा त्याच्या आयुष्याचा खरा मार्ग त्यांना दिसला…आणि सुरवात झाली फिरोज शेख यांच्या सामाजासाठी जगण्याच्या नव्या प्रवासाला….

ज्यात पहील्या पावलात कोरोना काळात गरजु गरीब लोकांना राशन वाटण्यापासुन ते आजतागायत अनेक रूग्णालयात फळे, ब्लॅकेट,वाटणे, निराधार लोकांना आर्थिक मदत करणे, रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या लोकांना मदतीचा हात देत कपडे, जीवनावश्यक वस्तु पुरविणे, सामान्य लोकांची अडचणी म्हणजे आपली अडचण याची जाण ठेवुन निस्वार्थ मनाने समाजासाठी झटणारी या नवीन व्यक्तिमत्वाने आज आपल्या कार्यातुन लोकांच्या मना मनात एक प्रेरणादायी स्थान निर्माण केले आहे. जात-धर्म विसरून प्रत्येकाच्या मदतीसाठी धाव घेणाऱ्या फिरोज शेख यांच्या व्यक्तिमत्वामुळे आज कॅम्प, कोंढवा,विमान नगर, येरवडा, रास्ता पेठ, पुणे स्टेशन अशा अनेक ठिकाणच्या नागरीकांना कोणत्याही प्रकारची अडचण, तक्रार निरासरणासाठी नाव घेतात ते फिरोज शेख यांचेच…

तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्वाचे याची जाण फिरोज शेख यांच्या या प्रवासातुन दिसते आपले पुढील सर्व आयुष्य सामाजाच्या हितासाठी झोकुन दिलेल्या या व्यक्तिमत्वाचे कार्य पुढे सुरू राहील यात लोकांना काडी मात्र शंका नाही. एका जनतेच्या सेवकाकडुन…नगरसेवकाकडुन समाजाला, लोकांना जी आशा असते ते सर्व गुणधर्म, समाजसेवेची भावना फिरोज शेख यांच्या कार्यातुन झळकत आहे त्याच्या कार्याच्या प्रकाशाने लोकांच्या अंधारमयी आयुष्यात एक आशेचे किरण दिले….ज्या मुळे येणाऱ्या निवडणुकीत नगरसेवकाच्या रूपात फिरोज शेख यांना पाहण्याची मागणी आज लोकां कडुन केली जात आहे ज्यामुळे समाजासाठीच्या हिताच्या कार्यकिर्दीला अधिक चालणा मिळेल….

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *