पोलिस कर्तव्य मेळावा २०२३…सुवर्ण, रौप्य, कांस पदके मिळवून महाराष्ट्र पोलिसांची दैदिप्यमान कामगिरी….
खादी एक्सप्रेस प्रतिनिधी (ऑनलाईन) : अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याच्या धर्तीवर दरवर्षी महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने आयोजित केला जातो. नुकत्याच पार पडलेला ६६ वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा दि. १३/०२/२०२३ ते दि. १७/०२/२०२३ दरम्यान भोपाळ मध्यप्रदेश येथे संपन्न झाला. त्यामध्ये संपुर्ण देशातुन एकुण २४ राज्य / संघराज्याच्या संघानी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाच्या वतीने एकुण ३२ स्पर्धक व ७ श्वान सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने देशातील द्वितीय क्रमांकाचा संघ म्हणुन रनरअप ट्रॉफी मिळवून महाराष्ट्र पोलीस दलासाठी २०१९ प्रमाणेच उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यामध्ये Anti Sabotage check प्रकारामध्ये विनर्स ट्रॉफी व Scientific Aid to Investigation या स्पर्धेची रनर अप ट्रॉफी मिळवुन दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे संघाने १ सुवर्ण, ४ रौप्य व ६ कास्य असे एकुण ११ पदके प्राप्त केली आहेत.गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्र पोलीस दलाचा संघ, अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये भाग घेत आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या संघाची निवड अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी, सन २००२ पासुन संपुर्ण राज्यात परिक्षेत्रीय व आयुक्तालय पातळीवर, पोलीस कर्तव्य मेळावे आयोजित करण्यात येवुन संबंधित परिक्षेत्र आणि आयुक्तालय संघामध्ये उत्कृष्ट अधिकारी व अंमलदार यांची निवड करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्यात येत आहे.स्पर्धेचा उद्देश हा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे व्यावसायिक कौशल्य, नैपुण्य व कार्यक्षमता यांचा दर्जा वाढविणे आहे. सदर पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या ६ प्रकारच्या स्पर्धांचा समावेश असतो.i. Scientific Aid to Investigationii. Police Photography Competitioniii. Police Videography Competitioniv. Anti Sabotage Check Competitionv. Computer Awareness Competitionvi. Dog Squad Competition* १८ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये १० आयुक्तालये ९ परिक्षेत्रे, गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, दहशतवाद विरोधी पथक आणि फोर्स वन मुंबई असे २४ संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतून यशस्वी झालेले अधिकारी अंमलदार यांची निवड, अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याकरीता करण्यात येणार आहे. याआधी देखील ६२ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा दि. १६/०७/२०१९ ते दि. २०/०७/२०१९ दरम्यान लखनऊ, उत्तरप्रदेश येथे संपन्न झाला. त्यामध्ये संपुर्ण देशातुन एकूण २७ राज्य / संघराज्याच्या संघानी सहभाग नोंदविला होता. सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाच्या वतीने एकुण ४० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या संघाने पहिल्यांदाच देशातील प्रथम क्रमांकाचा संघ म्हणुन जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी मिळवुन महाराष्ट्र पोलीस दलासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे Scientific Aid to Investigation या स्पर्धा प्रकारामध्ये हार्ड लाईनर ट्रॉफी व पोलीस व्हिडीओग्राफी या स्पर्धेची रनर अप ट्रॉफी मिळवुन दैदिप्यमान कामगिरी केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे संघाने ५ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कास्य असे एकुण १२ पदके प्राप्त केली आहेत. “खादी एक्सप्रेस” कडून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलास त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि दैदिप्यमान यशा बद्दल अभिनंदन…!