पुन्हा निर्भया …! महिलेवर बलात्कार करून गुप्तांगावर लोखंडी सळईने जखमा.

मुंबई ( खादी एक्सप्रेस ऑनलाईन ) : मुंबई येथील साकीनाका पोलिस ठाण्यातील हद्दीत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे . एका ३० वर्षीय महीले वर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकून तिला जखमी करण्यात आले आहे . पीडित महिलेला घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टर कडून देण्यात आली . साकीनाका खैरणी रोड या ठिकाणी रात्री ३ च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. साकीनाका खैरानी रोड जवळ रात्री ३ च्या सुमारास एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार साकीनाका कंट्रोल ला देण्यात आली. मिळालेल्या तक्रारी नुसार साकीनाका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटना स्थळी पोहोचले एका पांढऱ्या रंगाच्या टेम्पो मध्ये जखमी अवस्थेत असलेल्या पिडीत महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले . या प्रकरणी सी सी टी वी च्या आधारे आरोपी मोहन चव्हाण (वय- ४५ ) ला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेला सळई ने मारहाण करून तील्या गंभीर रित्या जखमी करण्यात आले आहे . ही घटना म्हणजे निर्भया घटनेची पुनरावृत्तीच. या घटने मध्ये आणखी आरोपींचा देखील समावेश असल्याची शक्यता दर्शवली जात आहे. मुख्य म्हणजे आरोपी हा पीडितेच्या ओळखीचा असल्याचे सांगितले जात आहे . साकीनाका पोलिसांकडून साथीदार आरोपीचा शोध आणि अधिक तपास सुरू आहे.

Khadi Express

एक अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र आणि ऑनलाइन न्यूज पोर्टल